January 20, 2026

ग्लोबल पुलोत्सव सोहळा 6 नोव्हेंबरपासून पुण्यात रंगणारपंडित अजय चक्रवर्ती यांना ‌‘पु. ल. स्मृती सन्मान‌’महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका 4 नोव्हेंबरपासून बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध

0
IMG-20251101-WA0025
Spread the love

पुणे : ‌‘सबकुछ पु. ल.‌’ असा यंदाच्या ग्लोबल पुलोत्सव दि. 6 ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा पुलोत्सव हा सन्मान सोहळा, पुलंविषयीचे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, पुलंवरील लघुपट तसेच पुलंच्या साहित्यावर आधारित महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्‌‍ अशा अनेक उपक्रमांनी समृद्ध होणार आहे.
करोना काळातील खंडानंतर हा महोत्सव होत असून यंदाचा महोत्सव साहित्य वर्तळासाठी खास आहे, कारण हे वर्ष पुलंच्या 25 व्या स्मृतिदिनाचे आणि सुनिता देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे आहे. दि. 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधित बालगंधर्व कलादालन, झपूर्झा आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे महोत्सवाचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुलंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज (दि. 1) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्सचे अजित गाडगीळ, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी दिली.
पुलोत्सव म्हणजे जगभरातील मराठी मनांचा केवळ आनंदसोहळा नसून साहित्यविश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे! पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वतः तर कलांचा आस्वाद घेतलाच पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करून रसिकांवर त्याची उधळण केली. जे जे कलासौंदर्य पुलंना भावले, त्याचा परिचय त्यांनी करून दिला. ज्यासाठी जगावे अशा अनेक गोष्टींवर त्यांनी स्वतः प्रेम केलेच; पण जगण्याचा आनंद घेण्यासाठी कलेशी मैत्री करायलाही शिकवले.
कोहिनूर गुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्स आयोजित या महोत्सवाचे सहप्रायोजक कोहिनूर कट्टा, झपुर्झा, रेवा डायमंड्स आणि कार्टुनिस्टस्‌‍ कम्बाइन आहेत.
बालगंधर्व कलादालनात आयोजित कार्यक्रम : दि. 6, दि. 7 आणि दि. 8 नोव्हेंबर : वेळ रोज सकाळी 11 ते दुपारी 1
गुरुवार, दि. 6 नोव्हेंबर :
महाराष्ट्रातील प्रमुख व्यंगचित्रकारांनी पु. ल. व त्यांच्या साहित्यास समर्पित केलेल्या व्यंगचित्रांचे खास प्रदर्शन, उद्घाटन : शुभहस्ते : ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर. कार्यक्रमाचे अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी.
पुलंच्या पंच्चाहत्तरीनिमित्ताने तयार झालेला, 1994 साली प्रदर्शित झालेला, त्यांच्या बहरूपी कारकिर्दीवरील दर्मिळ लघुपट ‌‘या सम हा‌’ (कालावधी 100 मि.). दिग्दर्शक : सुधीर मोघे, मुक्ता राज्याध्यक्ष.
शुक्रवार 7 नोव्हेंबर :
पु. ल. म्हणजे स्मरणरंजन.. पुलं म्हणजे परंपरेचा गौरव या रुढ प्रतिमेपुढचा विचार त्यांनी केला. यातूनच त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आणि मराठी मन आणि साहित्य टवटवीत ठेवले. या प्रवासाचा मागोवा घेणारे विचारमंथन : ‌‘काळापुढचे पुलं‌’ : सहभाग : विजय केंकरे, श्रीरंग गोडबोले, सुनंदन लेले, गौरी लागू. संवादक : मंगला गोडबोले.
शनिवार 8 नोव्हेंबर :
पु. ल. हे शब्दप्रभू होतेच पण त्यांनी सर्व कलांचा आस्वाद तर घेतलाच पण सर्व क्षेत्रातील लहान मोठ्या प्रतिभांच गुणगान पण केले. विविध माध्यमांचा वापर करून त्यांनी कलेचा सुगंध सर्वदूर पोहोचविला व रसिक श्रोत्यांना संस्कारीत केले. या भूमिकेचा आलेख मांडणारा परिसंवाद : ‌‘आस्वादक पुलं. सहभाग : कौशल इनामदार, भानू काळे, रवी मुकुल, प्रमोद कांबळे, वंदना बोकील-कुलकर्णी. संवादक : डॉ. मंदार परांजपे.
शुक्रवार, दि. 7 व शनिवार, दि. 8 नोव्हेंबर
झपुर्झा ः ‌‘रंगरेषांच्या सान्निध्यात‌’, रोज दुपारी 3 ते सायंकाळी 5
झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय
शनिवार, दि. 8 नोव्हेंबर
सुलेखन आणि अक्षर चित्रांना आपल्या जीवनाचा ध्यास मानणाऱ्या या कलावंताने मोडी लिपी संवर्धनाची अद्वितीय कामगिरी देश-विदेशात प्रसारीत केली. त्यांच्या अक्षर चित्रांनी भाषेच्या, लिपीच्या सगळ्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच आपल्याला अक्षर चित्रांचे सौंदर्य घडते. त्यांच्या पुस्तकांमधून प्राचिन ब्राह्मी, स्वरोष्ठी, ग्रंथी, शारदा, मोडी, अवेस्तन, सिद्धमपासून अनेक भारतीय भाषांचे कलात्मक दर्शन घडते. अशा स्वच्छंदी कलाकाराशी मनमोकळ्या गप्पा व कार्यशळेचा दुर्मिळ अनुभव.
अक्षर चित्रांचा वारकरी : पद्मश्री अच्युत पालव : संवादक : सुहास एकबोटे
शनिवार दि. 8 नोव्हेंबर
जलरंगाचे महत्व हे त्याच्या पारदर्शकतेमुळे, रंगांच्या प्रवहिपणामुळे आणि जलद वाळण्याच्या गुणधर्मामुळे आहे. यातून चित्रात प्रकाश आणि सावल्या अधिक प्रभाविपणे दाखविता येतात. रंगांच्या प्रवाहामुळे निसर्गातील हालचाली टिपणे सोपे होते. अशा या कलाप्रकाराचे महत्व जाणून घेणे व त्यातील द्गिज कलाकारांची गप्पांमधून ओळख करून देणारी कार्यशाळा : ‌‘जलरंग‌’. सहभाग ः मिलींद मुळीक, विलास कुलकर्णी, संजय देसाई, शैलेश मेश्राम.
झपूर्झा कार्यक्रम : अधिक माहितीसाठी : सुनील पाठक : 9850991008
समारोप समारंभ : शनिवार दि. 8 नोव्हेंबर, सायंकाळी 6 वाजता. स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर
प्रख्यात भारतीय शास्त्रीय गायक व पतियाळा घराण्याची गायकी जगविख्यात करणारे पंडित अजय चक्रवर्ती यांना यावर्षीचा ‌‘पु. ल. स्मृती सन्मान‌’ प्रदान सोहळा. शुभहस्ते : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर.
पुरस्काराचे स्वरूप : शाल, पुणेरी पगडी, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रु. 25,000/-
ग्लोबल पुलोत्सव म्हणजे निव्वल महोत्सव असणार नाही तर या माध्यमातून पुलंचे शब्द, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तसेच सर्जनशील अभिरूची संपन्नता यांचा ठेवा भावी पिढ्यांपर्यत पोहोचविण्याचा हा एक अभिजात प्रयत्न असणार आहे. रोजच्या जीवनातून हद्दपार होत असलेल्या विनादाचे महत्व या निमित्ताने भावी तरुणपिढीपर्यंत पोहोचावे या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
महोत्सवाचे सूत्रसचालन स्नेहल दामले करणार आहेत.
प्रवेश : या महोत्सवास विनामूल्य प्रवेश असून, पत्रकार व विशेष आमंत्रित यांच्यासाठी काही रांगा राखीव असतील. विनामूल्य प्रवेशिकांचे वाटप मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर पासून सकाळी 9 ते 11.30 व सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळात बालगंधर्वच्या बुकिंग विंडोवर (शिल्लक असेपर्यंत) करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button