आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक
असोसिएशनचे सचिव श्री. नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार श्री.रामदास तडस व पै.संदिप अप्पा भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यालय समोर आंदोलन केल्या गेले…
वास्तविक पाहता खेळाडूंनी असे आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणे ही क्रिडा क्षेत्रासाठी शोकांतिका म्हणावी लागेल… जो खेळाडू आपल्या उज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून खेळात आपले भवितव्य घडवत असतो त्या खेळाडूला त्याचा न्याय हा मिळालाच पाहिजे…. परंतु काही मंत्री व भ्रष्ट पदाधिकारी त्या खेळाडूंच्या स्वप्नाशीच खेळ करतात आणि खेळाडूंचे भवितव्य उध्वस्त करतात …अशा पदाधिकाऱ्यांना तत्काळ पदमुक्त करून खेळ व खेळांचे भवितव्य अबाधित राखावे…
तसेच क्रिडा क्षेत्रातील असे अनेक भ्रष्टाचार जनतेसमोर येण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही संघटना माहिती अधिकार कक्षेत यायला पाहिजे ज्यामुळे त्यांचे खरे रूप जगासमोर येईल आणि खऱ्या खेळाडूंना त्यांचा न्याय हक्क मिळेल अशी मागणी आमचे क्रीडा समन्वय समितीच्या वतीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे… आपले, लतेंद्र भिंगारे… अध्यक्ष, क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य…
