January 19, 2026

गणेशभक्तांच्या आरोग्यसेवेसाठी ‘दगडूशेठ’ च्या वतीने आयसीयूश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आयसीयू

0
IMG-20250829-WA0045
Spread the love


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याकरिता केवळ पुण्यातूनच नव्हे तर जगभरातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. त्यामुळे होणारी गर्दी व उद्भविणारी आपत्कालीन परिस्थिती यामध्ये तातडीची आरोग्यसेवा देण्यास ‘दगडूशेठ’ च्या वतीने यंदा आयसीयू ची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालय येथे आहेत. तर, गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर, आयसीयू ९ बेडची सुविधा देण्यात आली आहे. याचे उद्घाटन ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले.

उपसंचालक डॉ. नागनाथ येमपल्ली, डॉ. भगवान पवार, पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ.नीना बोराडे, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजवंनकर व इतर सहकारी उपस्थित होते. पुण्यातील नामांकित ३५ रुग्णालयांच्या सहकार्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडप परिसरात ४ रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आल्या आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, मंडप परिसरातील सुविधांसह भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, ससून सर्वोपचार रुग्णालय, संचेती हॉस्पिटल येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

एन.एम.वाडीया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन येथे मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा विनामूल्य मिळणार आहे. तर, ट्रस्टच्या ११ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येणार असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याकरिता केवळ पुण्यातूनच नव्हे तर जगभरातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. त्यामुळे होणारी गर्दी व उद्भविणारी आपत्कालीन परिस्थिती यामध्ये तातडीची आरोग्यसेवा देण्यास ‘दगडूशेठ’ च्या वतीने यंदा आयसीयू ची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button