January 19, 2026

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे जिल्हास्तरीय ‌‘अमृतप्रभा समूहगान‌’ स्पर्धेचे आयोजन

0
IMG-20250705-WA0025
Spread the love

पुणे : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय ‌‘अमृतप्रभा समूहगान‌’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गीत सादरीकरणासाठी यंदा ‌‘ध्वजगीत/झेंडागीत‌’ असा विषय देण्यात आला आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या इच्छेनुसार ‌‘अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा‌’ सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच देशाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी म्हणून 2023 मध्ये देशभक्तीपर व 2024 मध्ये प्रार्थना गीतांची स्पर्धा घेण्यात आली. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना ‌‘ध्वजगीत/झेंडागीत‌’ या विषयावर गीत सादर करायचे आहे. स्पर्धा मंगळवार, दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात येणार असून पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दि. 6 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी प्रवेशमूल्य नाही.
पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटात तीन बक्षिसे आणि उत्तेजनार्थ बक्षिस दिले जाणार आहे. गीत सादर करण्याचा कालावधी कमित कमी तीन ते जास्तीत जास्त पाच मिनिटे आहे. स्पर्धक संख्या कमित कमी आठ ते जास्तीत जास्त 12 इतकी असावी. संवादिनी, तबला अथवा ढोलक, ढोलकी किंवा इतर वाद्यांची संख्या चारपेक्षा जास्त नसावी. इलेक्ट्रॉनिक वाद्यांना परवानगी नाही तसेच ट्रॅकवर गाणे सादर करता येणार नाही. एका संस्थेला तीनही गटात सादरीकरण करता येणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र प्रवेशअर्ज देणे आवश्यक आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संतोष अत्रे (मो. 9850977828) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेसाठी प्रवेशअर्ज पाठविण्याची अंतिम मुदत दि. 19 जुलै 2025 अशी आहे. प्रवेश अर्ज प्रत्यक्ष अथवा amrutprabharpes@gmail.com या ई-मेलवर पाठविता येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button