January 20, 2026

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीमध्ये

0
IMG-20250708-WA0094
Spread the love

राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे ‘सूर्यदत्त’मध्ये आज उद्घाटन

राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी (एसआयआयएससी) या संस्थेमध्ये राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सायबर संसाधन केंद्राचे उद्घाटन उद्या बुधवारी (ता. ९) सकाळी १० वाजता ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक डॉ. ई. खालियाराज नायडू प्रमुख पाहुणे म्हणून, तर सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असणार आहेत.

सायबरसुरक्षा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती झाली आहे. आजच्या परस्परसंलग्न डिजिटल जगात, आपल्यासमोर डेटा चोरी, रॅन्समवेअर हल्ले, ओळख चोरी आणि सायबर युद्ध यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि क्वांटम संगणन यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे एकीकडे संधी वाढतील, तर दुसरीकडे अभूतपूर्व सुरक्षाविषयक धोकेही निर्माण होतील. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन, सातत्यपूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि शासन यांच्यातील मजबूत सहकार्य आवश्यक आहे.

नॅशनल सायबर रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून सायबरसुरक्षेतील आव्हानांबाबत जनजागृती वाढवण्यासह आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, परिसंवाद, कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाईल. हे कार्यक्रम विद्यार्थी, कामकाज करणारे व्यावसायिक, कॉर्पोरेट कर्मचारी आणि सरकारी अधिकारी यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरांकरिता खुले असतील. प्रत्येक व्यक्तीला सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व कौशल्ये प्रदान करण्याचा, तसेच आपल्या समाजात, संस्थांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रात सायबरसुरक्षेसाठी सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सज्ज करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल.

नॅशनल सायबर सिक्युरिटी रिसर्च कौन्सिल अर्थात राष्ट्रीय सायबर संशोधन परिषदेच्या सहयोगाने हे केंद्र सुरु करण्यात येत आहे. ही संस्था देशभरातील शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करून सायबर जनजागृती, डिजिटल सुरक्षिततेचा प्रचार आणि सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कार्य करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button