July 2, 2025

आपला सह-कलाकार हर्षदच्या जबरदस्त ऊर्जेचे आणि प्रतिभेचे शिवांगीकडून कौतुक

0
IMG-20250628-WA0038
Spread the love

लोकांच्या आवडत्या ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या नव्या सीझनने लोकांचे कुतूहल जागवले आहे, केवळ त्यातील भावनिक कथानकाने नाही, तर हर्षद चोप्रा आणि शिवांगी जोशी यांनी साकारलेल्या ऋषभ आणि भाग्यश्री या प्रमुख जोडीमधील रोमॅंटिक केमिस्ट्रीने! त्यांच्या पडद्यावरील अभिनयाचे खूप कौतुक होत आहेच पण प्रेक्षक पडद्याच्या मागे दिसणाऱ्या त्यांच्या गुणांचे देखील गुणगान करत आहेत.
या मालिकेत नायिकेची भूमिका करणाऱ्या शिवांगीने हर्षद सोबत काम करण्याचा अनुभव अलीकडेच शेअर केला आणि आपल्या या सह-कलाकाराचे भरभरून कौतुक केले. सेटवरचा अनुभव सांगताना ती म्हणते, “हर्षद दररोज सेटवर इतकी ऊर्जा घेऊन येतो! त्याची कामाबाबतची निष्ठा आणि त्याच्यातील प्रतिभा दोन्ही प्रेरणादायक आहे. त्याच्या अभिनयात एक सहजपणा आहे. त्यामुळे आमची जी एकत्र दृश्ये आहेत, त्यात जान येते. हळूहळू आमच्यात छान सख्य झाले आहे. आमच्यात एक मोकळेपणा आहे, एकमेकांविषयी आदर आहे त्यामुळे आमच्या दृश्यांमध्ये भावनिक गहिरेपण आणणे तसे सोपे जाते.”
या दोघांमधील केमिस्ट्री हा या मालिकेचा ठळक पैलू आहे. आणि हे स्पष्ट आहे की, पडद्याच्या मागे असलेल्या त्यांच्या सख्यामुळे पडद्यावर ते भावनिक क्षण उत्तम साकारू शकतात आणि ते प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. मालिका उलगडत जाईल तसे या दमदार जोडीकडून आणखी जास्त हृदयस्पर्शी आणि रोमॅंटिक क्षण अनुभवता येतील अशी प्रेक्षकांना आशा आहे.

बघा, ‘बडे अच्छे लगते हैं’चा नवा सीझन, दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button