नारी सशक्तिकरlणासाठी आज “क्लब ऑफ वीमेन C-O-W” कार्यरत

“क्लब ऑफ वीमेन C-O-W”च्या अंतर्गत गोकुळ अग्रो फार्म ला भेट*
महिना रोजच्या कामातून थोडासा स्वतः हा वेळ देता यावं म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीने मरून जावे यासाठी अग्रवाल समाज फेडरेशन महिला समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात महिलांसाठी, महिलांद्वारे आयोजित “क्लब ऑफ वीमेन C-O-W” द्वारा 100 हुन अधिक महिलांसाठी दररोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा विश्रांती म्हणून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचे आयोजन C-O-W संस्थेच्या अध्यक्ष नीता अग्रवाल , उपाध्यक्ष मीणा गोयल उषा तुलस्यान, सेक्रेटरी लक्ष्मी बंसल, खजिनदार मीनाक्षी अग्रवाल, वर्किंग कंमिटी सुजाता, अश्विनी, निर्मला यांनी केले.
यावेळी बोलताना नीता अग्रवाल म्हणाल्या, “आज महिला केवळ मुलं घर नातवंड यात गुंतून जातात. एकंदरीत साधारणपने वयाच्या 40शी नंतर महिलांना कुठे बाहेर फिरणं म्हणजे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यात केवळ कुटुंबा सोबत बाहेर पडता येत त्यांना. मग अशा उपक्रमातून त्यांना थोडा त्यांचा वेळ मिळतो सगळ्या गोष्टींमधून थोडी विश्रांती मिळते. आणि सगळ्यात महत्त्वचे म्हणजे नारी सशक्तिकरण करणं हा मुख्य उद्देश या क्लबचा आहे”.