सणस मैदान बंद केल्याचा तीव्र निषेध…
उपरोक्त विषयानुसार सदर पत्राद्वारे पुणे महानगरपालिकेचा निषेध करावा तितका कमीच आहे कारण गेली सुमारे तीन ते चार वर्षांपासून नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरसेवक नाही त्यामुळे पुणे मनपाचे प्रशासकीय अधिकारी हे राज्य सरकारच्या मनमानी व दबावाखाली जनतेच्या भावनेशी खेळ करत आहे… यात क्रीडा क्षेत्रही सुटले नाही कारण सर्व प्रथम आपल्या पुणे शहरातील क्रीडा संस्थाचे विविध क्रीडा प्रशिक्षण वर्ग हे अल्प दरात पुणे मनपा चे शाळांच्या मैदानांवर चालू होते परंतु आकस्मितपणे मनपाने सन 2014 पासून हजारो रुपयांची भाडे वाढ करून एकार्थी ते सर्व प्रशिक्षण वर्ग बंद केले त्यावर प्रत्येक वेळी सर्व तत्कालीन आयुक्त व संबंधित अधिकारी, मानिनियांना सविस्तर निवेदने दिली , आंदोलनं केले परंतु आजतागायत सुमारे 12 वर्षे लोटली परंतु कोणीही आपल्या पुणे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील असंख्य क्रीडापटूंसाठी कोणी धाऊन आले नाही न कोणी ते भरमसाठ केलेली भाडे वाढ कमी केली नाही त्यामुळे आजतागायत सर्व क्रीडा प्रशिक्षण वर्ग हे बंदच आहे… आणि आता तर सणस मैदानावर खेळाडूंना त्यांच्या सरावास बंदी घातली गेली याचा अर्थ पुणे शहरातील क्रीडा क्षेत्र उध्वस्त करून आजच्या अल्प व तरुण , तरुणींना व्यसनी व गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ द्यायचे की काय ? साहजिकच हा प्रश्न निर्माण होतो ..एकतर आज शालेय जीवनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राला म्हणावा असा वाव मिळत नाही… त्यामुळे आजची पिढी ही क्रीडा क्षेत्रापासून साहजिकच दूर होऊ लागली आहे आणि वाम मार्गावर जाऊ लागली याला सर्वस्वी जबाबदार हे मनपा प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर राज्य सरकार कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…परंतु या अशा क्रीडा क्षेत्रातील अन्यायाचा आम्ही क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य निषेध व्यक्त करत आहोत… आणि तत्काळ मैदानाचा निर्णय घेण्यात यावा तसेच सणस मैदानाचा बंद निर्णय रद्द करण्यात यावा व क्रीडा क्षेत्राचे पावित्र्य अबाधित राखले जावे अशी या मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माननिय पुणे मनपा आयुक्त साहेब व क्रीडामंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे करत आहोत… आपले लतेंद्र भिंगारे सर अध्यक्ष, क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य,
