थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीएत उभारणी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार, दि. 4 जुलै रोजी आयोजित करण्यात आला असून अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सभारंभ सकाळी 10:45 वाजता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात या भावनेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले असून कुंदनकुमार साठे सचिव आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यासाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार्य केल्याने पुतळा उभा करण्याची परवानगी मिळाली. सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचेही पुतळा उभारण्यात सहकार्य लाभले आहे.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने साडेतेरा फुट उंचीचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. चार हजार किलो ब्राँझचा वापर करून विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांना दीर्घ आयुष्य लाभले नाही. 40 वर्षांच्या आयुष्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळविला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना अजेय योद्धा पेशवे यांचा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे यांनी व्यक्त केली.
फोटो : श्रीमंत बाजीराव पेशवे
प्रति,
मा. संपादक
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण सभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी होत आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
कुंदनकुमार साठे, सचिव, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान
विवेक कुलकर्णी, सिटी ग्रुप
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801