सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या आरोपिंचा अटक पूर्व जामीन
पुणे : सासरच्या छळाला कटाळून कोमल राजू धुमाळ (वय २०) हिने माहेरी जिजामाता नगर, येरवडा येथे घरात गळफास घेत आत्महत्या केली. तीला आत्महत्येस करणीभूत असणारे पती प्रीतम जाधव (वय २९) सासू संगीता जाधव (वय ४८) सासरे चंद्रकांत जाधव ( वय ५५) सर्व राहणार पाचगणी, जिल्हा सातारा. हे सर्व जन कोमलच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत. या सर्वाना कायद्याने न्याय मिळावा सर्वाना अटक व्हावी. यासाठी कोमलचे वडील राजू धुमाळ यांनी आज पत्रकार भवन गांजवे चौक येथे पत्रकार परिषद घेतली.
कोमल आणि प्रीतम यांचे २१ नोव्हेंबर २०२४ मध्ये दोन्ही परिवाराच्या समतीने थाटामाटात राधाकृष्ण गार्डन शिवापूर येथे विवाह सपन्न झाला होता. २ फेब्रुवारी २०२५ रोजी कोमलला माहेरी सोडविण्यात आले. गावाकडे घर बांधायचे आहे. १० लाख रुपये माहेरहुन घेऊन ये अन्यथा नादवणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच लग्ना नंतर तीला मानसिक आणि शाररिक त्रास देण्यात आल्याचे कोमल कडून सांगण्यात आले होते. वारंवार पैश्याच्या मागणी मुळे. तसेच नांदायला परत घेऊन जात नसल्याने तीने माहेरी गळफास घेतला. त्याच दिवशी धुमाळ परिवाराने येरवडा पोलीस स्टेशन येथे गेले असता. त्याची तक्रार नेदविली गेली नाही उद्या या सांगण्यात आले. यावर दुसऱ्या दिवशी जाऊन तक्रार नेदविण्यात आला. वेळोवेळी पोलीस स्टेशन जाऊन पुढील तपासा विषयी विचारणा करण्यात आली प्रत्येक वेळी आरोपी फरार असल्याचे येरवडा पोलीसांन कडून सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात एक महिन्या नंतर त्याचा अटक पूर्वी जमीन झाल्याचे समजले. पोलीस अधिकाऱ्यांना भेट दिली महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही कित्येकदा भेट घेत सर्व परिस्थिती सांगण्यात आली तरीही पोलीस प्रशासन तसेच महिला आयोग यांच्या कडून कोणतीच मदत मिळत नसल्याने आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
