‘बापूं’च्या ‘लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकारणे’ हीच् सुमनांजली ..!

‘तत्वा शिवाय राजकारण’ (सिध्दांत बिना राजनिती) महात्मा गांधींच्या ७ पापे (7 Sins) पैकी १ होते..

  • गोपाळदादा तिवारी

पुणे प्रतिनिधी
पुणे दि २ आक्टों –
केवळ औपचारिकतेतून व जाहीरातांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या सारख्या मूल्यवादी व द्रष्ट्या नेत्यांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी व्यवस्था राबवणे आणि त्यांचे विचार व नैतिक मूल्यांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून त्यांना आदरांजली अर्पण केली ही समाधानाचीच बाब आहे. मात्र, एवढेच पुरेसे नाही. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सत्याग्रह, ग्रामस्वराज्य, नैतिकता या मूल्यांच्या आधारावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात राजेशाही पद्धती न राहता लोकशाहीच्या आधारावर लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, अशी त्यांची भावना होती, हे देखील गोपाळदादा यांनी निदर्शनास आणले.
सध्याच्या काळात लोकशाही मूल्य आणि लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची पायमल्ली होताना दिसून येत आहे. हे प्रकार रोखून महात्मा गांधी यांच्या विचारानुसार आचरण करून त्यांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करणे, राजकारण्यांसह भारताचे नागरिक म्हणून आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान पदाची जबाबदारी घेण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना एका रेल्वे अपघातातची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ही बाब सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे अशी अपेक्षाही तिवारी यांनी व्यक्त केली.
——————————————————///—–

“शास्त्रींजीं चे नेतृत्व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे होते”….! प्रशांत जगताप
पुणे दि २ आक्टों –
‘जय जवान-जय किसान’चा नारा देत दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी बळीराजा व राष्ट्राच्या सीमा रक्षणाचे काम करणाऱ्या जवानांची प्रतिष्ठा वाढवली. सरकारी खर्चातून व्यक्तिगत सोई व लाभ घेणे ते टाळत होते पंतप्रधान पदा नंतर स्वतःचे घर ही नसलेले व साधी राहणी व उच्च विचारसरणी बाळगणारे लाल बहादूर शास्त्रीं चे नेतृत्व नैतिकतेची व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे असल्याचे उदगार पुणे शहर (पुर्व विभाग) काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांनी शास्त्री जयंती निमित्त पुष्पहार अर्पण प्रसंगी काढले.
नवी पेठेतील, शास्त्री रोड वरील ‘लाल बहादूर शास्त्री पुतळ्यास’ प्रशांतजी जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, या प्रसंगी पुतळा समितीचे वतीने गोपाळदादा तिवारी यांनी त्यांचे व उपस्थिताचे स्वागत केले.
“राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रींची जयंती एकाच दिवशी हा लोकशाही प्रधान देशास संदेश देणारा अभितपुर्व योगायोग असुन, महात्मा गांधींना अभिप्रेत जनकल्याणकारी राज्याची संकल्पना शास्त्रीजींच्या कार्यातुन सतत जाणवत असल्याचे उदगार” शा्स्त्री पुतळा समिती सदस्य व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी काढले.
१९८९ साली, आपल्या वॅार्ढ मधुन जाणाऱ्या तत्कालीन (८० फुटी) एलबीएस रोड वर शास्त्रीं चा पुतळा बसवणे बाबत आपण पुढाकार घेऊन, सदरचा पुतळा शिल्पकार बी आर खेडकर यांचे कडुन बनवून, घेऊन तो आपण व बाळासाहेब देशमुख यांनी तत्कालीन महापौर ॲड अंकुश अण्णा काकडे (महापौर कारकिर्द संपण्यापुर्वी ३ दिवस) व नुतन महापौर बाळासाहेब राऊत यांचेकडे दि १२ मे १९८९ रोजी सुपुर्त केल्याचे पुतळा समिती संस्थापक सदस्य गोपाळदादा तिवारी यांनी या वेळी सांगितले.
पुणे मनपा’ने पुतळा जागेवरून न हलवता तेथेच नुतनीकरण केल्या बद्दल समाधान व्यक्त करून मनपा व संघर्ष करणाऱ्या मविआ कार्यकर्त्यांचे पुतळा समितीने धन्यवाद देऊन अभिनंदन केले.

या प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी हरीदास अडसुळ, योगेश भोकरे, ॲड विजय तिकोणे, आबा जगताप, राजेंद्र आलमखाने, अभिजीत महामुनी, शेखर पवार, गणेश ठोंबरे, अविनाश अडसुळ, शाम काळे, अनिल धिधिमे, दिलीप लोळगे इ कार्यकर्ते ऊपस्थित होते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button