September 24, 2026

प्रभाकर फाउंडेशनतर्फे रविवारी ‘देवगाणी’संगीतकार यशवंत देव पुरस्काराने डॉ. सलील कुलकर्णी यांचा होणार गौरव

0
IMG-20260916-WA0059
Spread the love

पुणे : संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभाकर फाउंडेशनतर्फे संगीतकार यशवंत देव पुरस्कार वितरण सोहळा व त्यांच्या गीतांवर आधारित ‘देवगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. संगीतकार यशवंत देव पुरस्काराने संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा गौरव केला जाणार असून पुरस्काराचे वितरण केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाच्या निमंत्रक, नगरसेविका ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. सूत्रधार निकिता मोघे असून संयोजन केतकी महाजन-बोरकर करीत आहेत. जितेंद्र अभ्यंकर आणि रश्मी मोघे ‘देवगाणी’ सादर करणार असून केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, राजेंद्र साळुंखे, समीर बंकापुरे, नरेंद्र चिपळूणकर साथसंगत करणार आहेत. स्नेहल दामले यांचे निवेदन आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : डॉ. सलील कुलकर्णी
प्रति,
मा. संपादक
संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभाकर फाउंडेशनतर्फे रविवारी संगीतकार यशवंत देव पुरस्कार वितरण सोहळा व त्यांच्या गीतांवर आधारित ‘देवगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
सुनील महाजन, संवाद पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी