July 1, 2026

प्रती,मा.डॉ. माधव मोहिते,उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे.

0
IMG-20260317-WA0026
Spread the love

शहरात घुसखोरी केलेल्या वानर टोळ्यांबाबत…

उन्हाळा आला की बहुधा अन्न पाण्याच्या शोधात वानरांच्या टोळ्या शहरात येत आहेत.
आत्ताच अशीच एक टोळी नारायण पेठेतील पुणे मनपा च्या हरिभाऊ साने वाहनतळाच्या आवारात आलीये. दोन दिवसापूर्वी कोंढवे धावडे च्या पुढे खडकवासला धरणालगत देखील रस्त्यावर अशीच एक टोळी ठाण मांडून होती.
अद्याप पर्यंत ह्या टोळ्यांनी कोणावर हल्ला केलेला नाही किंवा कोणास इजा पोहोचवलेली नाही, मात्र मध्यवस्तीत लहान मुलं किंवा इतरांना त्रास होऊ शकतो.
याबाबत पुणे मनपाचे उद्यान अधीक्षक श्री. अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता ” मनपा चे रेस्कयु सेंटर वन विभागाच्याच सूचनेनुसार बंद करण्यात आले असून याबाबत वन विभागाशीच संपर्क साधावा ” असे त्यांनी सांगितले.
त्यास अनुसरून आपणास सदर निवेदन सादर करत आहे.
याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व नागरिकांना देखील दक्षता घेण्याबाबत सूचना कराव्यात अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी