March 17, 2026

क्रेसेन्डो’ मध्ये युवा प्रतिभा व नेतृत्वाचा दिसला आत्मविश्वास

0
IMG-20260317-WA0029
Spread the love

आयएसबीएम मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘क्रेसेन्डो – २०२६ कार्यक्रम संपन्न

पुणे , दि. १७ मार्च : ,” क्रेसेन्डो २६ युवा प्रतिभा आणि नेतृत्वाची भावना व्यक्त करते. येथील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतला आणि नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत संंपूर्ण महोत्सव यशस्वीरित्या सांभाळला आहे. अशा सर्जनशीलता, समर्पण आणि टीमवर्कला एकाच व्यासपीठावर एकत्र येताना पाहणे प्रेरणादायी आहे.” अशी माहिती आयएसबीएम कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार यांनी दिली.
‘आत्मविश्वासाने सज्ज होऊन पुढे चला आणि नेतृत्व करा’ या संकल्पनेच्या आधारे इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया तर्फे नांदे कॅम्पसमध्ये आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवांपैकी महत्त्वाच्या ‘क्रेसेंडो २०२६’ मध्ये सर्जनशीलता, कलाविष्कार आणि तरुणाईची चैतन्यमय ऊर्जा एकत्र दिसली. देशभरातील ६० पेक्षा अधिक महाविद्यालयातील २५०० हून अधिक उत्साही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री उर्वशी परदेशी आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून ओळखल्या जाणारी सिमरन खान उपस्थित होत्या.
तसेय या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्टूडेन्ट कॉन्सिल चे प्रमुख आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. अमित कुमार, स्टूडेन्ट कॉन्सिलचे अध्यक्ष गौतम कृष्णन आणि उपाध्यक्ष दर्शील लोढा यांनी अथक परिश्रम केले.
या कार्यक्रमाच्या यशाबद्दल बोलताना गर्व तनेजा, चार दिवारी हिप्पोप संगीत रॉकस्टार, टीम युफोनी कन्टेंप्ररी फ्युजन म्युझिक बॉलिवूड बँड यांनी सांगितले की,” तुमच्या कलेचा आनंद घ्या, उत्तम संगीताला नेहमीच स्वतःची ओळख सापडते. आपल्या संगीताच्या प्रवासाचा उल्लेख करतांना सांगितले की प्रत्येक टप्पा हा तुमचा स्वतःचा आवाज शोधण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांना वाव देण्याचा सतत प्रयत्न करावा.”
चार दिवस चाललेल्या क्रेसेंडो महोत्सावात गाणे, डान्स, रॅम्पवॉक, फॅशन शो सारखे अनेक शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले. त्याच प्रमाणे चार दिवारी या कलाकारानी हिप हॉपचे एक अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले. यामुळे उपस्थितीतांच्या मनात अत्यंत उत्साह संचारला. त्यानंतर मुंबई येथील युफोनी या बँडच्या अत्यंत ऊर्जापूर्ण सादरीकरणाने रात्र अधिक बहरली. यांनी आपल्या दमदार संगीताने उपस्थितांचे मन जिंकलीत. यामध्ये पहिल्या दिवशीची सुरूवात ‘द मोमेंटम’ या थीमच्या आधारे विविध स्पर्धा आणि कलाविष्कारांनी झाली. दुसर्‍या दिवशी ‘द स्प्रेक्टेकल’ यामध्ये चैतन्यमय सांस्कृतिक सादरीकरणे आणि जोमदार स्पर्धांचा समावेश होता. तिसर्‍या दिवशी ‘द लिगसी’ ने झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सर्जनशीलता दिसून आली.
चार दिवसीय सांस्कृतिक महोत्सावात देशातील आघाडीच्या तांत्रिक आणि व्यवस्थापनक शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात एमआयटी डब्ल्यूपीयू, आयआयटी मद्रास, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, निकमार युनिव्हर्सिटी, ख्राइस्ट युनिव्हर्सिटी, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या बरोबर अन्य महाविद्यालयाने सहभागी झाले होते.

अधिक माहितीसाठी संपर्क –
9850554999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी