:माझी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी प्रसिद्ध करणे बाबतआपटे शाळेची माजी विद्यार्थी संघ जाहीर!
लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सभा 26 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली. त्यामध्ये सक्रिय असलेल्या माजी विद्यार्थ्यांची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
प्रसिद्ध उद्योगपती श्री तुषार केवटे यांचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री अल्ताफ पिरजादे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी गायत्री देशपांडे – दाते व अमित जाधव यांची निवड झाली. सचिव प्राचार्य गौतम मगरे पदसिद्ध अधिकारी म्हणून काम करत आहेत. सहसचिव व प्रसिद्धी प्रमुख हृषिकेश दातार , खजिनदार सौस्वती व्यास, सहखजिनदार सौ दिपाली मेमाणे संस्कृतिक विभाग प्रमुख श्री मनोज चव्हाण, महिला व बालविकास विभाग सौ अनिता पवार व अश्विनी कुलकर्णी, वार्तांकन अपूर्व सुरवसे, सदस्य पल्लवी पायगुडे, अतुल दिघे, भाग्यश्री काळे इत्यादींची नियुक्ती करण्यात आली. सल्लागार म्हणून पर्यवेक्षक अजित गायकवाड कामकाज करत आहेत. माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक म्हणून कामकाज शिक्षिका हर्षा पिसाळ करत आहेत.
यावेळेस बोलताना अल्ताफ पिरजादे म्हणाले माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून शाळेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून हातभार लावू.
पर्यवेक्षक अजित गायकवाड यांनी उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
अधिक माहितीसाठी – 9049450350 /9960544477
