कमांड मॅक्ससह ऑल-न्यू टाटा पंच दाखल
पुणे, जानेवारी १३, २०२६: टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. (टीएमपीव्ही) या भारतातील आघाडीच्या कार्स व एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही नवीन, अधिक गतीशील, अधिक स्मार्ट आणि अधिक आकर्षक लुकमध्ये लाँच करण्याची घोषणा केली.
नवीन टाटा पंचमध्ये तिच्या अद्वितीय सिग्नेचर ‘कमांड मॅक्स’ अंतर्गत अद्वितीय शक्ती, अधिक आरामदायीपणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान व शक्तिशाली स्टायलिंगचे संयोजन आहे. नवीन टाटा पंच फक्त ५.५९ लाख रूपयांच्या (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे.
टाटा पंच ऑक्टोबर २०२१ मध्ये पदार्पण करण्यासह सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये आघाडीवर आहे आणि जवळपास ७००,००० ग्राहकांनी विश्वास दाखवला आहे. यासह नवीन टाटा पंच आता उद्योग मापदंड निर्माण करण्याचा आपला वारसा प्रगत करत आहे, जेथे दोन नवीन पॉवरट्रेन्समध्ये लाँच करण्यात आली आहे:
१.२ लिटर टर्बोचार्ज्ड आयटर्बो रेव्होट्रॉन इंजिनसह उत्साहवर्धक कार्यक्षमतेचा आनंद घ्या. हे इंजिन अद्वितीय ड्रायव्हिंग उत्साहासाठी दर्जात्मक पॉवर-टू-वेट रेशिओ देते.
अद्वितीय कार्यक्षमता आणि सोयीसुविधेसाठी ट्विन-सिलिंडर आयसीएनजी तंत्रज्ञानासह एएमटी गिअरबॉक्सचे क्रांतिकारी संयोजन असलेल्या पहिल्या एसयूव्हीला ड्राइव्ह करण्याचा आनंद घ्या.
ऑल-न्यू टाटा पंच लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि.चे एमडी व सीईओ श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, ”पंचमधून नेहमी भारतीयांच्या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षा दिसून आल्या आहेत, तसेच वैशिष्ट्य-संपन्न पॅकेजसह एसयूव्ही अनुभवाचे लोकशाहीकरण केले आहे. ज्यामुळे ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. पंचने भारतीयांना लक्षवेधक स्थिती व आत्मविश्वासासह लांबचा, तणावमुक्त, आंतरशहरीय प्रवासाचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य दिले. आज, आम्ही या अनुभवाला नव्या उंचीवर नेले आहे. नवीन पंचसह आम्ही या श्रेणीमधील एसयूव्हीला नवीन आकार दिला आहे, जेथे ग्राहकांच्या अभिप्रायानुसार आधुनिक तंत्रज्ञानासह ही एसयूव्ही डिझाइन करण्यात आली आहे. ही एसयूव्ही अधिक गतीशील, अधिक स्मार्ट आणि अधिक सुरक्षित आहे, ज्याला पूरक आकर्षक, शक्तिशाली पवित्रा आहे, ज्यामधून कमांड मॅक्सचा आत्मविश्वास मिळतो. या उत्क्रांतीमधून ग्राहकांना अधिकाधिक आनंद देण्यासाठी सतत नाविन्यता आणण्याप्रती आमची रुची दिसून येते. आम्हाला भारतातील अनेकांचे मन जिंकण्यासाठी नवीन पंच लाँच करण्याचा आनंद होत आहे.”
