‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ मध्येअत्याधुनिक कार्डियाक कॅथ लॅबचे उद्घाटन
पुणे, दि. १० जानेवारी : धावपळीच्या जीवनात वाढत जाणाऱ्या हृदयविकारांच्या रुग्णांना वेळेवर योग्य निदान व उपचार मिळावेत, या मुख्य उद्देशाने माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक कार्डियाक कॅथ लॅब सुरू करण्यात येणार आहे. या लॅबचे उद्घाटन दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांनी दिली.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष साठे यांच्या हस्ते आणि एमआयटी समूह संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
या कॅथ लॅबच्या सुविधेमुळे रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी तसेच न्युरोरेडिओलॉजी सेवांना बळकटी मिळणार आहे. गंभीर व तातडीच्या रुग्णांवर वेळेवर, समन्वयित आणि बहुवैद्यकीय उपचार देणे अधिक सुलभ होईल. त्यामुळे गरजू रुग्णांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या सह-व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड नागरे आणि विश्वस्त डॉ. वीरेंद्र घैसास यांनी केले आहे.
जनसंपर्क विभाग,
श्री सरस्वती कराड रुग्णालय, पुणे