होमलेनची फ्रँचायझी विस्तारीकरण योजनेला गती
पुणे, ३१ डिसेंबर २०२५: होमलेन या भारतातील आघाडीच्या एण्ड-टू-एण्ड होम इंटीरिअर्स सोल्यूशन्स प्लॅटफॉर्मने लाभक्षमतेमध्ये परिवर्तन करत आर्थिक वर्ष २०२४-२५ ची सांगता केली, जेथे आर्थिक वर्ष २५ मध्ये महसूल २२ टक्क्यांच्या वाढीसह ७५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, तर चौथ्या तिमाहीत ईबीआयटीडीएमध्ये सकारात्मक वाढ झाली. या गतीला अधिक प्रबळ करत कंपनी १२ महिन्यांच्या कालावधीत प्रमुख मेट्रो बाजारपेठांपेक्षा पलीकडे विस्तार करत आणखी १०० नवीन फ्रँचायझी-नेतृत्वित स्टोअर्स लाँच करण्याच्या आपल्या योजनेची अंमलबजावणी करत आहे.
कंपनीचे फ्रँचायझी नेटवर्क दोन मॉडेल्स अंतर्गत कार्यरत आहे: एफओसीओ (फ्रँचायझी-ओन्ड, कंपनी-ऑपरेटेड) आणि नुकतेच लाँच करण्यात आलेले एफओएफओ (फ्रँचायझी-ओन्ड, फ्रँचायझी-ऑपरेटेड). २०२५ मध्ये होमलेनने देशभरात आपली फ्रँचायझी उपस्थिती अधिक वाढवली, जेथे ४० हून अधिक शहरांमध्ये ५५,००० हून अधिक घरांचे काम पूर्ण केले आणि दररोज जवळपास ३० घरांमध्ये इन्स्टॉलेशन केले. मुंबई, बेंगळुरू व दिल्ली-एनसीआर अशा प्रमुख शहरांपासून सिलगुडी, जयपूर व कोची अशा उदयोन्मुख बाजारपेठांपर्यंत फ्रँचायझी-नेतृत्वित मॉडेलने विश्वसनीय, तंत्रज्ञान-संचालित इंटीरिअर सोल्यूशन्स सक्षम केले आहेत, ज्यांना प्रोप्राइटरी सॉफ्टवेअर आणि सर्वोत्तम पुरवठा साखळयांचे पाठबळ लाभले आहे.
”आम्ही २०२५ मध्ये केलेल्या प्रगतीने होमलेनमध्ये विकासाच्या पुढील उत्साहवर्धक टप्प्यासाठी मंच स्थापित केला आहे,” असे होमलेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्रीकांत अय्यर म्हणाले. ”आमच्या फ्रँचायझी नेटवर्कचे विस्तारीकरण आणि ऑपरेशनल क्षमतेच्या अधिक सक्षमीकरणाने आम्हाला देशभरातील अधिकाधिक घरमालकांना उच्च दर्जाचे, तंत्रज्ञान-सक्षम इंटीरिअर्स देण्यास मदत केली आहे. वर्ष २०२६ कडे वाटचाल करत आम्ही प्रमुख शहरांमध्ये व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तसेच सर्वोत्तम, विश्वसनीय व सहजसाध्य इंटीरिअर सोल्यूशन्स देत राहू. आमचे फ्रँचायझी सहयोगी आणि तंत्रज्ञान-नेतृत्वित अंमलबजावणीसह आम्हाला शाश्वत विकासाला गती देण्याचा आणि भारतातील होम इंटीरिअर्स क्षेत्रात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याचा विश्वास आहे.”
होमलेनच्या एण्ड-टू-एण्ड, डिझाइन-ते-उत्पादन दृष्टिकोनामधील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्यांचे एआय-संचालित मालकीहक्काचे डिझाइन व नियोजन प्लॅटफॉर्म ‘स्पेसक्राफ्ट’. प्रगत मशिन लर्निंग व ३डी व्हिज्युअलायझेशनला एकत्र करत स्पेसक्राफ्ट वास्तविक किंमत व ऑटोमेटेड नियोजन देते, ज्यामुळे डिझाइनर्स व ग्राहकांना अधिक जलदपणे व अधिक अचूकपणे निर्णय घेता येतात, ज्यामधून संकल्पनेपासून अंतिम अंमलबजावणीपर्यंत विनासायास समन्वयाची खात्री मिळते. कंपनीचे १६० हून अधिक लॅमिनेट शेड्सचे सर्वोत्तम कॅटलॉग, तसेच खाजगी लेबल असलेली उत्पादने टायरॉक्स हार्डवेअर आणि हायड्रॉगार्ड प्लस बोर्ड्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये विश्वसनीय व उच्च दर्जाच्या उत्पादन वितरणाला साह्य करतात.
२०२५ मध्ये होमलेनने डिझाइनकॅफेचे संपादन केले, ज्यासह बाजारपेठेतील आपली उपस्थिती अधिक दृढ केली. आर्थिकदृष्ट्या एकत्रितपणे कंपनीने आपल्या मुलभूत बाबींना दृढ केले, एकत्रित निव्वळ नुकसान आर्थिक वर्ष २४ मधील १२१.७ कोटी रूपयांवरून आर्थिक वर्ष २५ मध्ये ८० कोटी रूपयांपर्यंत कमी केले आणि युनिटच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा केली, जेथे ईबीआयटीडीए नुकसान १५ टक्क्यांवरून ९.९ टक्क्यांपर्यंत कमी केले. कंपनीने २०२४ मध्ये २२५ कोटी रूपयांचे नवीन भांडवल देखील उभारले, ज्यासह धोरणात्मक सहयोग आणि दीर्घकालीन विकास योजनांना पाठिंबा मिळाला.
वर्ष २०२६ कडे वाटचाल करत होमलेनने आपल्या फ्रँचायझी नेटवर्कची उपस्थिती अधिक दृढ करण्याची योजना आखली आहे, जेथे मुंबई व एनसीआर यांसारख्या उच्च क्षमता असलेल्या प्रमुख शहरांवर, तसेच झपाट्याने विकसित होत असलेल्या द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांवर देखील अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आपले मालमत्ता-केंद्रित फ्रँचायझी मॉडेल, तंत्रज्ञान-नेतृत्वित अंमलबजावणी आणि विश्वसनीय वितरण कटिबद्धतेला अधिक प्राधान्य देत कंपनीचा ब्रॅण्डेड, एण्ड-टू-एण्ड इंटीरिअर सोल्यूशन्स अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा, तसेच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये संपूर्ण वर्षात उत्तम लाभक्षमता संपादित करण्याचा मनसुबा आहे.
भारतातील होम इंटीरिअरर्स बाजारपेठ अंसघटित कंपन्यांऐवजी ब्रॅण्डेड, तंत्रज्ञान-सक्षम सोल्यूशन्सकडे वाटचाल करत असताना होमलेन विकास, फ्रँचायझीमध्ये वाढ आणि ऑपरेशनल स्थिरता ध्येयासह वर्ष २०२६ मध्ये प्रवेश करत आहे, तसेच कंपनी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी स्वत:ला सुसज्ज करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. एफओएपसफओबाबत चौकशीसाठी कृपया आम्हाला becomeapartner@homelane.com येथे ईमेल करा.
