January 19, 2026

सनदी लेखापालांवर देशाचे आर्थिक आरोग्य जपण्याचे दायित्व

0
IMG-20251229-WA0028
Spread the love

करिअरमध्ये नैतिकता, कौशल्य विकास, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव हवा

  • डॉ. विद्या येरवडेकर यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’च्या वतीने १४०० विद्यार्थ्यांना ‘सीए’ पदवी प्रदान

पुणे: “समाजाचे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यात डॉक्टरची भूमिका महत्वाची असते, तर देशाचे आर्थिक आरोग्य जपण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर असते. सीए हे अर्थव्यवस्थेचे डॉक्टर आहेत. तुम्ही विद्यार्थी आता सीए म्हणून ही जबाबदारी निभावणार आहात. त्यामुळे याचे भान ठेवून नैतिकता, कौशल्यांचा विकास आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करत नवनव्या गोष्टी शिकत सीए म्हणून तुमचे करिअर अधिक समृद्ध करा,” असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नवी दिल्ली व ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीक्षांत समारंभात डॉ. येरवडेकर बोलत होत्या. बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित समारंभावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य व समारंभाचे मुख्य समन्वयक सीए चंद्रशेखर चितळे, समन्वयक सीए उमेश शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए हृषिकेश बडवे आदी उपस्थित होते. एकूण १४०० विद्यार्थ्यांना सीए सभासदत्व देत पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, “आजचा सीए केवळ लेखापरीक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी आर्थिक ज्ञानासोबत तांत्रिक चपळतेची जोड आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये (जीसीसी) भारतीय सीएंची वाढती मागणी असून, देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करताना तरुण सीएंनी प्रामाणिकपणा आणि नैतिकतेची कास धरावी.”

फॉरेन्सिक ऑडिट, जीएसटी आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स यांसारख्या नव्या क्षेत्रांत सातत्याने कौशल्यवृद्धी करण्याचे आवाहन सीए उमेश शर्मा यांनी केले. कौशल्यवृद्धी, व्यावसायिक शिस्त आणि नैतिक आचारसंहिता, ग्राहकांचा विश्वास, सामाजिक जबाबदारीची जाणीव यांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात सीए सचिन मिणियार यांनी ‘आयसीएआय’च्या वतीने सीए सभासदांच्या उत्थानासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पदवी प्राप्त करणे हा एक टप्पा असतो, मात्र, प्रभावी करिअरसाठी आयुष्यभर सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

सीए पदवीधरांनी व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करण्याची शपथ घेतली. गुणवत्ताधारक व क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए अभिषेक धामणे यांनी आभार मानले.

फोटो ओळ
००५६: बाणेर: ‘आयसीएआय’च्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. विद्या येरवडेकर. प्रसंगी डावीकडून सीए निलेश येवलेकर, सीए प्रणव आपटे, सीए सचिन मिणियार, सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, सीए अभिषेक धामणे, सीए नेहा फडके.

००६१: बाणेर: ‘आयसीएआय’च्या दीक्षांत समारंभात डॉ. विद्या येरवडेकर यांचा सन्मान करताना डावीकडून सीए निलेश येवलेकर, सीए प्रणव आपटे, सीए सचिन मिणियार, सीए चंद्रशेखर चितळे, डॉ. येरवडेकर, सीए उमेश शर्मा, सीए अभिषेक धामणे, सीए नेहा फडके.

००६८, ७४, ७७, ७९, ८४: बाणेर: ‘आयसीएआय’च्या दीक्षांत समारंभात डॉ. विद्या येरवडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करताना. प्रसंगी डावीकडून सीए निलेश येवलेकर, सीए प्रणव आपटे, सीए सचिन मिणियार, सीए चंद्रशेखर चितळे, विद्यार्थी, डॉ. विद्या येरवडेकर, सीए उमेश शर्मा, सीए अभिषेक धामणे, सीए नेहा फडके व सीए ह्रषीकेश बडवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button