April 1, 2026

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर होणार

0
Screenshot_20251214_142214_Gallery
Spread the love

पुणे दिनांक 14 ~ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा येत्या 25 डिसेंबर रोजी वाढदिवस असून संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर संघर्षदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.संघर्षनायक रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आपआपल्या भागात रक्तदान शिबिर आरोग्य चिकित्सा शिबिर रुग्णांना फळ वाटप गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; थंडीत गरिबांना चादर वाटप आदी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून संघर्षदिन साजरा करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइं च्या पुणे शहर कार्यालय येथे करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे;पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे; राज्य सचिव बाळासाहेब जानराव; शैलेश चव्हाण श्याम सदाफुले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी