परफॉर्मन्स, स्टाइल, सर्वोत्तम बॅटरीसह POCO चा सी ८५ फाईव्ही जी दाखल
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 : भारतातील अग्रगण्य कंझ्युमर टेक ब्रँड्सपैकी एक असलेल्या पोकोने पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवा मापदंड ठरवत POCO C85 5G हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. गतिमान भारतीय युवकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन ₹12,000 च्या सेगमेंटमध्ये स्टाइल, दमदार परफॉर्मन्स आणि सर्वोत्कृष्ट बॅटरीचे अनोखे संयोजन प्रदान करतो.
या स्मार्टफोनममध्ये ६०००मेगाहर्ट्झची जबरदस्त बॅटरी आहे. यामुळे दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस मोबाईल चार्जिंग कायम राहते. अत्याधुनिक ३३ व्हॅटफास्ट चार्जिंग मुळे फक्त २८ मिनिटांत ५०% पेक्षा जास्त चार्ज मिळतो तर १०व्हॅटवायर्ड रिव्हर्स चार्जिंग फीचरमुळे हा फोन पॉवर बँक म्हणूनही वापरता येतो.
भारताच्या ‘ऑन-द-गो’ जीवनशैलीसाठी हा फोन खास तयार करण्यात आला आहे. स्लीम ७.९९ एमएम बॉडी, क्वाड-कर्व्ह्ड बॅक, आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशसोबत हा फोन मायस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पाँवर ब्लँक या आकर्षक रंगांमध्ये मिळतो.
या स्मार्टफोनमध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.९-इंचाचा एचडीप्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यासोबत १२० हर्ट्झ अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे—गेमिंग, व्हिडिओ आणि स्क्रोलिंग अत्यंत स्मूद बनवतो.
फोनला मिडिया टेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर (450K+ AnTuTu स्कोअर) आणि १६जीबीपर्यंत टर्बो रॅमची साथ आहे.
Android १५ वर आधारित हायपर ओएस २.२ सह यामध्ये IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स, 50MP AI ड्युअल कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
