सर्वाधिक भाविक भेटीबद्दल ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा विश्वविक्रमश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ठरले संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर ; विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली नोंद
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर ठरले आहे. नुकतेच विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स च्या चेअरमन मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल व १८४ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील रासने आणि कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांना
विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जगभरातील भक्तांचे लाडके आराध्य दैवत आहे. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात. यंदा संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर म्हणून हे विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
- फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर ठरले आहे. नुकतेच विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
