January 20, 2026

डेन्व्हर फॉर मेन आणि शाहरुख खान यांनी ‘सेंट ऑफ सक्सेस’ या नवीन अभियानाच्या माध्यमातून यशाचा नवा अर्थ सांगितला

0
IMG-20251127-WA0028
Spread the love

● शाहरुख खानला दर्शविणाऱ्या डेन्व्हर फॉर मेनच्या ‘सेंट ऑफ सक्सेस’ या नवीन अभियानात ही कल्पना मांडली आहे की, खरे यश प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठेत नसून विनम्र आणि साधे राहण्यात असते.

● या फिल्ममध्ये एक सामान्य दैनंदिन क्षण दाखवला आहे, ज्यात वागण्यातून अहं डोकावतो. हे पाहताना आपल्याला स्मरते की, तुम्ही इतरांना कशी वागणूक देता यातून तुमचा खरा मोठेपणा दिसतो.

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२५: भारतातील आघाडीच्या आणि सर्वात प्रतिष्ठित पुरुषांच्या ग्रूमिंग ब्रॅंडपैकी एक डेन्व्हर फॉर मेन या ब्रॅंडने आपल्या गाजलेल्या ‘सेंट ऑफ सक्सेस’ अभियानाच्या दुसऱ्या अध्यायाचे अनावरण केले, ज्यामध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान दिसणार आहे. या नव्या फिल्ममधून ‘द रियल सेंट ऑफ सक्सेस’चे या ब्रॅंडच्या जुन्या तत्वज्ञानाचा आणखी प्रसार केला आहे. यश कसे प्राप्त केले याच्या पलीकडे जात तुम्ही ते कसे निभावता याचा शोध या फिल्ममध्ये घेतला आहे. ‘यश डोक्यात जाऊ देऊ नये, ते हृदयात गेले पाहिजे’ या विचाराभोवती गुंफलेल्या सदर अभियानातून डेन्व्हरची ही मान्यता दिसून येते की, तुम्ही किती उंच गेलात यावरून यश कळत नाही तर उंचावर जाऊनही तुमचे पाय किती जमिनीवर आहेत यातून ते कळते.

या कॅम्पेन फिल्ममध्ये एक दैनंदिन परिस्थिती दाखवली आहे, जेव्हा माणसाच्या वागण्यातून त्याचा अहंकार आणि लहान-मोठेपणाचा अभिमान दिसून येतो. हा क्षण अस्सल आणि आपल्या परिचयाचा वाटावा असा आहे. कोणतेही मोठे इशारे न करता किंवा उपदेश न देता शाहरुख विचारांचा आवाज बनतो आणि प्रेक्षकांना स्मरण देतो की, यश स्वतःचा मोठेपणा दाखवण्यात नाही, तर विनम्र आणि दयाळू राहण्यात आहे. जाहिरातीतील कथानक खरेखुरे आणि जवळचे वाटते. त्यात आधुनिक महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब दिसते. या जाहिरातीतून प्रत्येकाला हेच सांगितले आहे की, यश हृदयात राहिले पाहिजे, तिथेच त्याला राहू द्या.

डेन्व्हरसाठी होत गेलेला हा बदल त्यांच्या ब्रॅंडच्या प्रवासातील स्वाभाविक प्रगती आहे. बऱ्याच काळापासून यशाचा उदो उदो केल्यानंतर – चिकाटी, लवचिकता आणि कठोर परिश्रमातून मिळालेले यश – आता हा ब्रॅंड याचा शोध घेत आहे की यश मिळाल्यानंतर त्याने कसे वागले पाहिजे. या सखोल शोधामुळे डेन्व्हरच्या परिचयाला भावनिक जोड मिळते. हा केवळ ग्रूमिंगचा ब्रॅंड नसून त्यापेक्षा जास्त असल्याची ब्रॅंडची स्थिती अधिक मजबूत होते. एक असा ब्रॅंड, जो आत्मविश्वासासोबत चारित्र्य आणि स्टाइलसोबत अर्थपूर्णतेवर भर देतो.

शाहरुख खानचे डेन्व्हरशी असलेले नाते याच तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे. सामान्य स्थितीमधून सुरुवात करून जागतिक प्रसिद्धी मिळवण्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रवासातून लक्षावधी लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होतात. पण आपल्याला भिडते, ती त्याची प्रसिद्धी नाही, तर त्याची विनम्रता. जीवनातील सर्व थरांमधील लोकांना तो ज्या आपलेपणाने आणि सन्मानाने वागवतो ते आपल्याला आवडते. त्याच्यातील ही अस्सलता त्याला डेन्व्हरचा हा संदेश लोकांपर्यंत नेण्यासाठी योग्य चेहरा बनवते, की खरे यश हे टाळ्यांच्या कडकडाटात नसून ज्या विनम्रतेने तुम्ही आपल्या सिद्धी सांभाळता त्यामध्ये आहे.

सदर अभियानाविषयी टिप्पणी करताना HSPL (डेन्व्हर फॉर मेनची प्रमोटर कंपनी)चे मॅनिजिंग डायरेक्टर आणि अध्यक्ष श्री. सौरभ गुप्ता म्हणाले, “यश हे डेस्टिनेशन नाही, ती एक शिस्त आहे. डेन्व्हरमध्ये आमचा हा ठाम विश्वास आहे की, माणूस किती उंच जातो यावरून त्याचे मोठेपण सिद्ध होत नाही, तर उंच गेल्यानंतरही तो किती साधा, जमिनीवर राहतो यावरून त्याचे मोठेपण ठरते. हे अभियान आमच्या याच मान्यतेचे प्रतिबिंब आहे. हे अभियान स्मरण देते की, यशाचा संबंध ताकद किंवा पदाशी नाही तर उपस्थिती, सौम्यता आणि सहानुभूतीशी आहे. शाहरुख खानच्या माध्यमातून आम्ही हा विचार जिवंत करत आहोत- कृत्रिमतेतून नाही, तर प्रामाणिकपणातून. त्याचा वैयक्तिक प्रवास आमच्या या मान्यतेचे मूर्त रूप आहे- नम्रतेसह चिकाटी आणि सहृदयतेसह सिद्धी. कारण, शेवटी, जे यश जीवनाला स्पर्श करत नाही, ते यश कसले!”

या अभियानासह डेन्व्हर फॉर मेन सचोटी, उद्देश आणि विनम्रता हे गुण असणाऱ्या पुरुषांचा गौरव करण्याच्या या ब्रॅंडची परंपरा पुढे नेत आहे. त्यांच्या प्रीमियम फ्रॅग्रन्सेसची आणि ग्रूमिंग एसेन्शल्सची रेंज आधुनिक भारतीय पुरुषाशी साधर्म्य दाखवते – असा पुरुष जो दिखाव्यापेक्षा गुणांना अधिक महत्त्व देतो आणि अस्सल सुगंधाप्रमाणे यश देखील तेच खरे असते, जे सौम्यतेने दरवळते आणि आपल्या उपस्थितीतून बोलते, ताकदीतून नाही.

लिंक: https://www.instagram.com/reel/DQgq8vsjK7u/?igsh=MXZ2aW43eHNyMDk3aQ==

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button