January 19, 2026

‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ पुन्हा पुण्यात परतलापुणे आता जगभरातील पर्यटनाशी जोडणार!आता मिळणार पूर्वीपेक्षा अधिक सुट्ट्यांचे पर्याय!

0
IMG-20251127-WA0023
Spread the love

आयआयटीएम पुणे: 27 – 29 नोव्हेंबर 2025
स्थळ: डेकेन कॉलेज ग्राउंड, येरवडा,
बॉम्बे सॅपर्सजवळ, पुणे
वेळ: सकाळी 11:00 ते सायंकाळी 6:00

पुण्यातील प्रतिष्ठित ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय ‘सन्माननीय पाहुण्यां’च्या उपस्थितीत करण्यात आले; ज्यामध्ये श्री. नरेंद्र देव भट्ट, सदस्य – कार्यकारी समिती, नेपाळ टुरिझम बोर्ड; श्री. निलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे; श्री. अमित कुमार शर्मा, अध्यक्ष, पुणे हॉटेलियर्स असोसिएशन; श्री. जीवन हेंद्रे, बोर्ड सदस्य आणि चॅप्टर चेअरमन, वेस्ट इंडिया, एंटरप्रायझिंग एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया; श्री. याझदी मार्कर, मान्यवर सचिव, टीएएआय; श्री. शाहबेहराम रब्बानी, अध्यक्ष, स्काल इंटरनॅशनल, पुणे; श्री. पांडुरंग टावरे, फाउंडर – अ‍ॅग्री टुरिझम; आणि श्री. स्वप्नील राजे होळकर यांचा समावेश होता.

26 वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर, या शहरांमध्ये आयआयटीएम आज पश्चिम भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि अग्रगण्य ट्रॅव्हल इव्हेंट म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमात प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टुरिझम बोर्ड, ट्रॅव्हल ऑपरेटर्स, हॉस्पिटॅलिटी ब्रँड्स, तंत्रज्ञान प्रदाते आणि पर्यटन क्षेत्रातील इतर प्रमुख संस्था सहभागी होत आहेत.

यंदाच्या पुणे आवृत्तीत 10 पेक्षा जास्त देशांमधून आणि 20 भारतीय राज्यांमधून 200 पेक्षा अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. तीन दिवसांच्या या भव्य प्रदर्शनात विविध पर्यटन स्थळे, प्रवासाशी संबंधित उत्पादने, सेवा आणि पर्यटन क्षेत्रातील नवीन गोष्टी दाखवल्या जाईल. नेपाळ, श्रीलंका, केनिया, थायलंड, भूतान, युरोप यासारखे काही देश यावेळी आपली पर्यटन वैशिष्ट्ये सादर करणार आहेत.

या प्रदर्शनात सहभागी प्रदर्शकांमध्ये राज्य पर्यटन मंडळे, आंतरराष्ट्रीय पर्यटन कार्यालये, डीएमसी, विमान कंपन्या, क्रूज कंपन्या, हॉटेल्स, ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स आणि डेस्टिनेशन वेडिंग स्पेशलिस्ट यांचा समावेश आहे. यंदाच्या आवृत्तीत प्रवाशांसाठी खास ऑफर्स, संवाद सत्रे, आकर्षक पर्यटन स्थळांचे प्रेझेंटेशन्स आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट का?

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (आयआयटीएम) हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वाधिक विश्वसनीय ट्रॅव्हल ट्रेड शो म्हणून ओळखला जातो. दोन दशकांहून अधिक काळाच्या अनुभवासह, आयआयटीएमने पर्यटन क्षेत्रातील बदलत्या गरजा ओळखून स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत. हा कार्यक्रम व्यवसाय नेटवर्किंग, ज्ञानाची देवाण-घेवाण आणि व्यापार संबंध यांचा एकत्रीत अनुभव देतो.

आयआयटीएम ची वैशिष्ट्ये:

सिद्ध वारसा: आयआयटीएमने देशातील प्रमुख शहरांमध्ये 100 हून अधिक प्रदर्शन यशस्वीरित्या आयोजित केली आहेत, ज्यामुळे पर्यटन उद्योग दर्जेदार खरेदीदार आणि प्रवास उत्साही लोकांशी जोडला गेला आहे.
पश्चिम भारतातील प्रमुख ट्रॅव्हल इव्हेंट: पुण्यातील आवृत्ती या प्रदेशातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात, व्यापारात सहभागी होतात आणि ज्यामुळे व्यवसायाच्या संधी निर्माण होतात.
बी2बी केंद्रित: आयआयटीएम हे पर्यटन स्थळे, बी2बी डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या, हॉस्पिटॅलिटी उत्पादने आणि ट्रॅव्हल यांच्यातील अंतर कमी करते, त्यामुळे नवीन पर्यटन स्थळे, ट्रॅव्हल उत्पादने आणि सेवा सुरू करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरते.

आयआयटीएम हे भारताच्या प्रवासाची शहरांनुसार, संपर्कांनुसार कहाणी उलगडणारे ठिकाण आहे.

आयआयटीएमचे आयोजक, श्री. संजय हाखू, डायरेक्टर, स्फेअर ट्रॅव्हलमीडिया अँड एक्झिबिशन यांनी सांगितले:“ गेल्या काही वर्षांत, इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट दक्षिण भारताच्या पर्यटन कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण इव्हेंट बनला आहे. आमचे पुणे प्रदर्शन फक्त एक इव्हेंट नसून, ती व्यवसाय वाढविण्यासाठी, नवीन संधी शोधण्यासाठी आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रवास बाजारातील उद्योग संबंध मजबूत करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे.”

श्री. रोहित हंगल, डायरेक्टर, स्फेअर ट्रॅव्हलमीडिया अँड एक्झिबिशन यांनी यामध्ये भर घातली:
“पुण्याचे सर्वात मोठे आणि प्रभावशाली ट्रॅव्हल प्रदर्शन पुन्हा सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारताच्या विविध भागांतून आणि परदेशातून वाढत्या सहभागामुळे, आयआयटीएम या प्रदेशातील पर्यटन क्षेत्राची विविधता, ऊर्जा आणि प्रचंड क्षमता अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण मंच ठरत आहे.”

या प्रदर्शनात देशांतर्गत पर्यटन स्थळे, आंतरराष्ट्रीय पर्यटन मंडळे, लक्झरी ट्रॅव्हल, अनुभवात्मक पर्यटन, ट्रॅव्हल तंत्रज्ञान आणि शाश्वत पर्यटन उपाययोजना यांसाठी विशेष पॅव्हिलियन असतील. यामुळे नेटवर्किंग आणि एकत्र काम करण्याच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.

पुणे आणि भारताच्या पर्यटन बाजारात गुंतवणूक का करावी?

भारताचे पर्यटन क्षेत्र केवळ वाढत नाही, तर वेगाने प्रगती करत आहे. जगातील टॉप पर्यटन क्षेत्रामध्ये भारताची गणना होते. येथे गुंतवणूकदार, सेवा पुरवठादार, पर्यटन स्थळांचे प्रचार करणारे आणि तंत्रज्ञान कंपन्यांसाठी मोठ्या आणि विविध संधी उपलब्ध आहेत. म्हणूनच, गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ का आहे ते जाणून घेऊया:

पश्चिम भारतातील वेगाने वाढणाऱ्या बाजारावर लक्ष केंद्रित

पुणे आज भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि महत्त्वाच्या प्रवास व पर्यटन क्षेत्रापैकी एक बनले आहे. यामागे मजबूत आर्थिक सामर्थ्य, तरुण लोकसंख्या, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाची वाढती इच्छा हे कारण आहे. पुण्यात तरुण व्यावसायिक, उद्योजक आणि सुशिक्षित कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यांच्या हातात जास्त खर्च करण्याची क्षमता असून, त्यांना प्रवासाची आवडही आहे. त्यामुळे पुण्यातील लोक सुट्ट्या, अनुभवात्मक प्रवास, लक्झरी स्टे, क्रूझेस आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळे यांचा सक्रियपणे शोध घेतात.

पुणे विमानतळाचा विस्तार होत असल्यामुळे आणि नवीन उड्डाण मार्ग सुरू होत असल्यामुळे महत्त्वाच्या देशांतर्गत आणि काही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांशी संपर्क सातत्याने सुधारत आहे. मुंबई जवळ असल्यामुळे जागतिक कनेक्टिव्हिटीही अधिक सोयीस्कर होते, ज्यामुळे पुण्यातील स्थानिक रहिवासी आणि व्यवसायांसाठी परदेशी प्रवास अधिक सोयीस्कर बनतो.

भारतातून वाढता आंतरराष्ट्रीय प्रवास
भारतात अनेक नवीन विमानतळ उभारले जात आहेत, जे वाढत्या परदेश प्रवासाच्या मागणीची पूर्तता करतील.
महामारीनंतर भारत हा आंतरराष्ट्रीय प्रवासात सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक आहे.
भारतातील 7.2% लोकांकडे पासपोर्ट आहे, आणि त्यापैकी बहुतेकांनी गेल्या दशकात त्यांचा वापर केला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 96 दशलक्ष (9.6 कोटी) भारतीयांकडे पासपोर्ट होते, आणि यावर्षी हा आकडा 100 दशलक्ष (10 कोटी) ओलांडेल अशी अपेक्षा आहे.
उद्योग अहवालानुसार, भारताचा आंतरराष्ट्रीय प्रवास बाजार 11% पेक्षा जास्त वेगाने वाढून 2032 पर्यंत $44 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होईल.
भारतीय पासपोर्टधारकांना आता 57 देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा मिळते.
परदेशात प्रवास करताना भारतीय पर्यटक जगातील सर्वाधिक खर्च करणाऱ्या प्रवाशांमध्ये गणले जातात. भारतीय पर्यटकांचा खर्च 2018 मधील 23 अब्ज डॉलर वरून 2028 पर्यंत 45 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.

आयआयटीएम  मध्ये, B2B फक्त व्यवसाय नाही, हे एक धोरणात्मक संधी आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button