बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (बीएआय) २९ व्या ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे आयोजन
- अजय गुजर यांची पत्रकार परिषदेत माहिती; विविध १६ प्रकारांचे राष्ट्रीय पुरस्कार
पुणे: सार्वजनिक विकास प्रकल्प, बांधकाम क्षेत्रातील महत्वपूर्ण संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय स्तरावरील ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटेशन’ या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे २९ वे वर्ष आहे, अशी माहिती ‘बीएआय’ पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘बीएआय’ महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, स्पर्धेचे समन्वयक सुनील मते, पुणे सेंटरचे उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अजय गुजर म्हणाले, “बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर हे देशभरातील २५० पेक्षा अधिक सेंटरपैकी सर्वात सक्रिय आणि उत्साही असे सेंटर आहे. वर्षभरात स्टडी सर्कल, सेमिनार, कार्यशाळा, स्टुडंट इंटर्नशिप प्रोग्राम्स, राष्ट्रीय स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर स्पर्धा’ ही त्यापैकीच एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. सहकारी कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक व बिल्डर्स यांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उच्च-गुणवत्तेच्या कामाला सन्मान देणारी ही स्पर्धा आहे. बांधकाम उद्योगाची प्रतिमा उंचावण्यासह कंत्राटदारांना त्यांचे कार्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरवात १९९७ मध्ये झाली.”
सुनील मते म्हणाले, “या कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना, बिल्डर्सना आणि तरुण उद्योजकांना विविध पुरस्कारांद्वारे सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते. विजेत्यांची निवड पूर्णपणे स्वतंत्र तृतीय-पक्ष ज्युरी पॅनेलद्वारे केली जाते. सिव्हिल अभियांत्रिकी, स्ट्रक्चरल डिझाईन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, बिल्डिंग सर्व्हिसेस, ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सी आणि कन्स्ट्रक्शन सेफ्टी अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असतो. ज्युरी पॅनेल प्राप्त झालेल्या नोंदींवर आधारित सहभागींमध्ये प्राथमिक निवड करते. निवडलेल्या उमेदवारांना कळवून त्यांचे प्रकल्प बीएआय पुणे सेंटरच्या कार्यालयात सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते. त्यानंतर, ज्युरी पॅनेल संबंधित प्रकल्पांच्या साइट भेटी देते आणि सर्व नियम व निकषांचे पालन सविस्तरपणे तपासून निश्चित मार्किंग प्रणालीद्वारे मूल्यांकन करते.”
विविध १६ प्रकारांत होणार स्पर्धा
“निवासी (बंगला / रो हाऊस / फार्म हाऊस), निवासी (स्टँडअलोन – सिंगल प्लॉट बिल्डिंग्स), निवासी (स्टँडअलोन – सिंगल प्लॉट रिडेव्हलपमेंट), निवासी (मल्टी बिल्डिंग प्रोजेक्ट), व्यावसायिक (मॉल्स, शॉपिंग सेंटर, ऑफिसेस, हॉस्टेल्स / यांचे संयोजन), व्यावसायिक (इन्स्टिट्यूशनल / हॉस्पिटल्स / रिक्रिएशनल सेंटर / आयटी पार्क्स), पुणे / मुंबई बाहेरील स्ट्रक्चर (निवासी – बंगला, स्टँडअलोन बिल्डिंग), पुणे / मुंबई बाहेरील स्ट्रक्चर (व्यावसायिक), औद्योगिक (कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही आकाराचे), इन्फ्रास्ट्रक्चर (ब्रिज, फ्लायओव्हर, अंडरपास), इन्फ्रास्ट्रक्चर (ESR, GSR, STP, ETP इ.), इन्फ्रास्ट्रक्चर (रस्ते प्रकल्प – व्हायाडक्ट / अक्वाडक्ट इ.), शासन (राज्य व केंद्र), उप-शासकीय, सार्वजनिक कामे (निवासी / हाऊसिंग / ऑफिसेस), शासन (राज्य व केंद्र), उप-शासकीय, सार्वजनिक कामे (व्यावसायिक, सार्वजनिक इमारती, मल्टी-यूज बिल्डिंग्स, विशेष इमारती), लँडस्केप (गार्डन, ओपन स्पेस डेव्हलपमेंट, पब्लिक पार्क्स) (किमान 80% क्षेत्र सॉफ्टस्केप), बेअर शेलपर्यंतचे काम (RCC, मॅसनरी व प्लास्टर वर्क्स समाविष्ट) या १६ प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत आहे,” असे सुनील मते यांनी नमूद केले.
पुणे कॅम्प: पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून महेश राठी, जगन्नाथ जाधव, अजय गुजर, सुनील मते व राजाराम हजारे.
