January 19, 2026

सहस्त्र दीपोत्सवाने लखलखली श्रीमंत गायकवाड सरकार सदरश्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान तर्फे सलग ६ व्या वर्षी आयोजन ; गोमाता पूजन

0
IMG-20251018-WA0071
Spread the love


पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय…यदुवंशभूषण सेनाखासखेल समशेर बहाद्दर बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार की जय… जय भवानी… जय शिवाजी…अशा जयघोषात श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला.

निमित्त होते, वसुबारसच्या पवित्र दिनी श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान कार्यक्षेत्र अखंड भारत, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दावडी, समस्त ग्रामस्थ दावडी निमगाव यांच्या वतीने सलग सहाव्या वर्षी शिवशके ३५२ सायंकाळी श्रीमंत गायकवाड सरकार सदर, गायकवाड किल्ला, दावडी निमगाव ता. खेड जि. पुणे येथे आयोजित क्षत्रिय परंपरे नुसार गोमाता पूजन आणि सहस्त्र दिपोत्सव सोहळ्याचे.

या क्षत्रिय सोहळ्यासाठी गायकवाड प्रतिष्ठानचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिव प्रवीणभय्या गायकवाड, बाबासाहेब दिघे, सुरेशआप्पा डुंबरे, रवी गायकवाड, गणेश गायकवाड, दिपक गायकवाड, अशोककाका गायकवाड, मयूर कोहिनकर गायकवाड, आदित्य गायकवाड, संकेत गायकवाड, ऋत्विक गायकवाड, ईशान गायकवाड, विशाल गायकवाड, सागर गायकवाड, तसेच महाराष्ट्रातील पुणे, चांदखेड, कुरुळी, सांगली, सोलापूर, कवठेमहांकाळ केज जिल्हा बीड, पंढरपूर, कटगुण जिल्हा सातारा, तरडगाव जिल्हा सातारा येथून आलेले गायकवाड स्वराज्यघराण्याचे वंशज आणि महिला मंडळ यांसह दावडी निमगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात गायकवाड स्वराज्य घराण्यातील महिलांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन तसेच गायकवाड सरकार तख्ताचे पूजन करुन करण्यात आली.

खेड तालुक्यातील दावडी गाव हे शिवकालात अतुलनीय पराक्रम गाजवलेल्या समस्त गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव‌. येथूनच गायकवाड स्वराज्य घराण्याचा विश्व विस्तार झाला. येथूनच गायकवाड यांनी शिवरायांनी संस्थापलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावत स्वराज्य विस्तारासाठी कूच करुन बडोदा गुजरात जिंकून स्वराज्याचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. पुढे गायकवाडांचे थोरले घर हे बडोदा नरेश म्हणून स्थिरावले. दावडीमध्ये गायकवाड यांचा अंदाजे ७०० वर्षांपूर्वी पूर्वी बांधलेला भुईकोट किल्ला आहे. किल्यातील गायकवाड सरकार वाड्यामध्ये आजही गायकवाडांची गादी तख्त आहे आणि याच “श्रीमंत गायकवाड सरकार सदरेवर” वसुबारसेच्या पवित्र दिनी सहस्त्र दीप मानवंदना व गोमाता पूजन हा कार्यक्रम अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेले ५ वर्षापासून सुरु झाला.

गायकवाड स्वराज्य घराण्याचा विश्व विस्तार येथून जरी झाला असेल तरी विश्वभर पसरलेल्या गायकवाड स्वराज्य घराणे हे स्वतःच्या उगमस्थाना पासून दुर होते. गायकवाड घराण्यातील सदस्यांना आपले मूळ गाव, सकल इतिहास ज्ञात नव्हता. श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे सचिव वंशवेलकार इतिहास संशोधक श्री प्रविणभय्या दत्ताजी गायकवाड (चांदखेड) यांनी स्वसंशोधनातून हा गौरवशाली इतिहास सप्रमाण गायकवाड स्वराज्य घराण्यापर्यंत पोहचवला.

अमित गायकवाड म्हणाले शिवजयंती १९ फेब्रुवारीला २०१५ साली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात गायकवाड स्वराज्य घराण्याचा रथ सहभागी करुन घेतला आणि विश्वभरातील गायकवाड एकत्र येण्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. तदनंतर २०२० साली आम्ही सदरेचा जिर्णोध्दार करुन पानिपत वीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांना मानवंदना देणारा कार्यक्रम १४ जानेवारी २०२० रोजी पानिपत शौर्य दिनी सदरेवर घेतला. त्याच वर्षी वसुबारसेला गोमाता पूजन आणि सहस्त्र दिपोत्सव सोहळ्याने दिवाळीमध्ये सदर उजाळून निघाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button