टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून सस्टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ सादर
बेंगळुरू, ऑक्टोबर ९, २०२५ – टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आपला सर्वसमावेशक सस्टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ जारी केल्याची घोषणा केली आहे, ज्यासह पर्यावरणीय स्थिरता आणि भारतातील अद्वितीय विकासात्मक क्षेत्रासाठी डिझाइन करण्यात आलेल्या शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.
कर्नाटक सरकारचे माननीय वन, पर्यावरण आणि पर्यावरण मंत्री श्री. ईश्वर खंद्रे यांच्या हस्ते या अहवालाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कॉर्पोरेट प्लॅनिंग अँड ग्रीन फील्ड प्रोजेक्टचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. स्वप्नेश मारू; मुख्य संप्रेषण अधिकारी, वरिष्ठ उपाध्यक्ष व राज्य व्यवहार प्रमुख श्री. सुदीप दळवी आणि टीकेएमचे इतर प्रमुख दिग्गज उपस्थित होते. यामधून भारताच्या कार्बन तटस्थता आणि शाश्वत उत्पादन उत्कृष्टतेकडे परिवर्तनामध्ये उत्प्रेरक म्हणून कंपनीची भूमिका अधिक स्पष्ट झाली.
अनावरण समारोहाप्रसंगी मत व्यक्त करत कर्नाटक सरकारचे माननीय वन, पर्यावरण आणि पर्यावरण मंत्री श्री. ईश्वर खंद्रे म्हणाले:
”जेथे हरित तेथे मोकळा श्वास आणि जेथे वन तेथे भविष्य ही बाब सर्वांना समजल्यास आपण आपल्या पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संरक्षण करण्यास सक्षम होऊ. आज, जगामध्ये जागतिक ताापमानवाढ व हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत आणि वृक्ष संवर्धन व वनीकरण हेच एकमेव व्यवहार्य उपाय आहेत. या संदर्भात, मी राज्यातील सर्व उद्योगांना त्यांच्या परिसरात अधिक झाडे लावण्याचे, रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षारोपणाचे संरक्षण करण्याचे आणि हरित इमारतींच्या पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करतो. मी नवीकरणीय ऊर्जेचा वापर, जलसंवर्धन आणि पाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर देखील भर देतो.”
सस्टेनेबिलिटी रिपोर्टच्या अनावरणाप्रसंगी टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या कॉर्पोरेट प्लॅनिंग अँड ग्रीन फिल्ड प्रोजेक्टचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. स्वप्नेश मारू म्हणाले, ”आमचा दृष्टिकोन भारताच्या सीओपी२६ पंचामृत कटिबद्धतांशी संलग्न आहे, तसेच देशाच्या कार्बन तटस्थता कटिबद्धतेला पाठिंबा देत आहे आणि टोयोटाच्या जागतिक एन्व्हायरोन्मेंटल चॅलेंज २०२५ ला गती देत आहे. या समन्वयामधून दिसून येते की, कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी रोडमॅप्स अर्थपूर्ण पर्यावरणीय प्रगतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय हवामान उद्देशांसह विनासायासपणे एकीकृत होऊ शकतात. अंतर्गत पर्यावरणीय आव्हानांचे निराकरण करत आम्ही भारताशी संबंधित उपायांना गती देत आहोत, जे स्थानिक पर्यावरणीय वास्तविकतांचे निराकरण करतात, तसेच जागतिक हवामान ध्येयांप्रती योगदान देतात. प्रत्येक लावण्यात आलेले झाड, अवलंबण्यात आलेली प्रत्येक किलोवॅट नवीकरणीय ऊर्जा आणि उत्पादित करण्यात आलेली प्रत्येक हरित वेईकल यामधून भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन करण्यासह सर्वांकरिता गतीशीलता निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
टोयोटाचा सस्टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ पर्यावरणीय स्थिरता, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासनासंबंधित प्रमुख उपक्रमांना निदर्शनास आणतो. टीकेएम कार्बन तटस्थतेप्रती परिवर्तनाला गती देण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे, ज्यासाठी उत्पादनांच्या पलीकडे जात आहे, उत्पादन कार्यसंचालनांमध्ये आणि संपूर्ण मूल्य साखळीमध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करत आहे.
नवीन वेईकल शून्य कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन
भारतातील वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी टीकेएमने xEV पोर्टफोलिओचा विस्तार करून बहुमार्गीय इलेक्ट्रिफिकेशन दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल्स (एसएचईव्ही), बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल्स (बीईव्ही), फ्युएल सेल इलेक्ट्रिक वेईकल्स (एफसीईव्ही), प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल्स (पीएचईव्ही), तसेच पर्यायी इंधन संचालित वेईकल पॉवरट्रेन यांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवर हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करत कंपनी भारतातील वैविध्यपूर्ण आर्थिक क्षेत्रात शुद्ध गतीशीलता किफायतशीर व सहजसाध्य करत आहे, तसेच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स-फ्यूएल वेईकल्स (ईएफएफव्ही) विकसित करत आहे, ज्या भारताच्या जैवइंधन एकीकरण ध्येयांची पूर्तता करतात.
गतीशीलता परिसंस्थेचे डिकार्बनायझेशन
भारतातील गुंतागूंतीचे पुरवठा साखळी नेटवर्क व लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा वेईकल जीवनचक्रादरम्यान कार्बन उत्सर्जनांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे ओळखून टीकेएमने सर्वसमावेशक हरित पुरवठा साखळी उपक्रमांसह कडक पुरवठादार ईएसजी अनुपालन आवश्यकतांची अंमलबजावणी केली आहे. टीकेएमचे इको-डिलरशिप नेटवर्क ग्राहक टचपॉइण्ट्समध्ये पर्यावरणावरील परिणाम कमी करतात, तसेच हरित लॉजिस्टिक्स कार्यसंचालने संपूर्ण मूल्य साखळीमध्ये परिवहनाशी संबंधित उत्सर्जन कमी करतात.
हरित ऊर्जेचा अवलंब
भारतातील औद्योगिक उत्पादन क्षेत्र जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जेवर अधिक प्रमाणात अवलंबून असल्याचे ओळखत टीकेएमने सर्व उत्पादन कार्यसंचालनांमध्ये १०० नवीकरणीय ग्रिड इलेक्ट्रिसिटी संपादित केली आहे. कंपनी २०३५ पर्यंत कार्बन-तटस्थ उत्पादन कार्यसंचालनांप्रती, तसेच २०५० पर्यंत संपूर्ण मूल्य साखळीमध्ये शून्य कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन संपादित करण्याप्रती कटिबद्ध आहे. कंपनी ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानांचा देखील अवलंब करत आहे, जे दरवर्षाला विशिष्ट ऊर्जा वापर कमी करतात.
पाणीटंचाईचे निराकरण
टीकेएमने रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि जल पुनर्चक्रण यंत्रणेच्या माध्यमातून ८९.३ टक्के पाण्याची आवश्यकता पूर्ण केली आहे. भारतातील भूजल पातळी कमी होण्यासह उद्योगासाठी पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे हा उत्तम उपक्रम आहे. झीरो-लिक्विड डिस्चार्ज फॅक्टरीमुळे औद्योगिक पाणी दूषित होण्यास प्रतिबंध होतो. टीकेएम सामुदायिक पाणलोट प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाणी साठवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांच्या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाण्याचा साठा होण्याची खात्री देते.
प्रभावी जल व्यवस्थापन
भारतातील मर्यादित पुनर्वापर पायाभूत सुविधांसह मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि ग्राहकांच्या वापरानंतर कचरा निर्मितीचा सामना करताना टीकेएमने सर्व उत्पादन प्रकल्पांमध्ये झीरो वेस्ट-टू-लँडफिल दर्जा प्राप्त केला आहे. कंपनी व्यापक ३आर (रेड्यूस, रियुज, रिसायकल) अंमलबजावणीद्वारे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त कचरा पुनर्वापर दर राखते. कंपनी सक्रिपणे भारताच्या वेईकल स्क्रॅपेज पॉलिसीला पाठिंबा देते, जेथे एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्ससाठी अधिकृत रिसायकलिंग चॅनेल्स निर्माण केले आहेत, तसेच उत्पादन व ग्राहक वापरानंतरच्या टप्प्यांमध्ये चक्रिय अर्थव्यवस्था उपक्रमांसाठी सज्ज आहे.
जैवविविधतेचे संवर्धन
भारतात झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे आणि परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. टीकेएमच्या टोयोटा ग्रीन वेव्ह प्रोजेक्टने कॅम्पसमध्ये ११२ एकर जागेवर हरित आच्छादन निर्माण केले आहे, भारतातील मियावाकी वनीकरणाचे अग्रणी उदाहरण आहे. टीकेएमने परिसरात ७९० हून अधिक स्थानिक वनस्पती प्रजाती आणि ४०० हून अधिक प्राणी प्रजाती वाढवून स्थानिक परिसंस्थेचे संवर्धन केले आहे. कंपनीने २५ एकरचे इकोझोन अनुभवात्मक शिक्षण केंद्र देखील स्थापन केले आहे, ज्याने ४०,००० हून अधिक विद्यार्थी आणि भागधारकांना सक्षम केले आहे. यामधून पर्यावरणीय संतुलन आणि हवामान स्थिरतेप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
कृतींद्वारे पर्यावरणाप्रती जागरूकतेचा प्रसार
टीकेएमची वर्षभर पर्यावरणीय जाणीवेप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत कंपनी पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मासिक कार्यक्रम आणि संवाद उपक्रम आयोजित करते. जून महिना हा पर्यावरण महिना म्हणून समर्पित आहे, ज्यामधून कर्मचारी, स्थानिक समुदाय, पुरवठादार-डीलर भागीदार इत्यादी विविध भागधारकांचा समावेश असलेल्या स्थानिक, प्रभावी कृतींमध्ये जागतिक पर्यावरण जागरूकतेचा प्रसार करण्याप्रती कंपनीची समर्पितता निदर्शनास येते.
प्रशासन उत्कृष्टता आणि भागधारकांचा विश्वास
टीकेएमचा शाश्वतता आराखडा उत्तम देखरेख आणि पारदर्शक पद्धतींद्वारे प्रशासनाच्या परिपक्वतेला दाखवतो. बोर्ड स्तरावर ईएसजीबाबत विचार करण्याला प्राधान्य दिले जाते, ज्यामधून दीर्घकालीन ध्येयांचे धोरणात्मकरित्या पालन होण्याची खात्री मिळते.
सामुदायिक सक्षमीकरण आणि सामाजिक स्थिरता
या अहवालामधून सामाजिक शाश्वततेप्रती टीकेएमची समर्पितता देखील दिसून येते. टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (टीटीटीआय)मध्ये प्रगत प्रशिक्षण उपक्रम विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह व हरित कौशल्यांसह सुसज्ज करतात, भावी कर्मचारीवर्गाला पाठिंबा देतात. कंपनीने नेतृत्व भूमिका आणि टेक्निकल क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत, आपल्या कार्यसंचालनांमध्ये सर्वसमावेशकतेला चालना देत आहे. मोबाइल क्लिनिक्स व टेलिमेडिसीन सेवांच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपक्रमांचा देखील विस्तार करण्यात आला आहे, ज्यामधून अधिकाधिक समुदायांना आवश्यक वैद्यकीय केअर सेवा उपलब्ध होत आहेत. कंपनी जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित केलेल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना देखील साह्य करते.
पुढील वाटचाल
कंपनी महत्त्वाकांक्षी पोस्ट-२०२५ रोडमॅप तयार करत आहे, जो नाविन्यता आणि सहयोगावर लक्ष केंद्रित करतो. टीकेएमची हरित गतीशीलता सोल्यूशन्सला गती देण्याची, तसेच विद्यमान आवश्यकतांपलीकडे नवीकरणीय ऊर्जा खरेदीचा विस्तार करण्याची योजना आहे. तसेच कंपनी संसाधनांचा वापर सानुकूल करण्यासाठी आणि शाश्वतता निष्पत्ती साधण्यासाठी सर्वांसोबत काम करत आहे. हा रोडमॅप ‘जस्ट ट्रान्झिशन’वर भर देतो, ज्यामधून खात्री मिळते की कंपनीचे हरित परिवर्तन सर्व भागधारकांसाठी सर्वसमावेशक व न्याय्य राहिल.
