तात्काळ कोल्ड्रिफ सिरप … वर बंदी करा….
कालपासून सर्वच चॅनल वर कोल्ड सिरप या औषधामुळे बालके दगावल्यायची बातमी मोठ्या प्रमाणात समोर आली आहे त्यामुळे मध्य प्रदेश,राजस्थान,तामिळनाडू,केरळ मध्ये या सिरप वर बंदी घातली आहे ..ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातही पालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे… आणि सध्या बदलत्या हवामान वातावरणाने असंख्य बालके सर्दी,ताप,खोकला, होऊन निमोनियाचे प्रमाणात वाढ झाली आहे त्यावर संबंधित डॉक्टरांकडून इतर औषधं देताना विविध कफ सिरप देतात …यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज ठरली आहे यासाठी प्रशासनाने सर्व डॉक्टरांसाठी सूचनांचे पत्रक जारी करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जावी… राज्याच्या अन्न व औषधं प्रशासन विभागाने आणि पुणे महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागृत राहून सर्व मेडिकल दुकानांची पाहणी करून सदर सिरप सापडल्यास ते जप्त करून त्याची तपासणी करून त्यांना योग्य ती कायदेशीर समज द्यावी… आणि नागरिकांना भयमुक्त करावे .. अशी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमचे बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मागणी करीत आहोत ..
कळावे,आपले, लतेंद्र भिंगारे…अध्यक्ष …
