श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात मंदिरासमोर ‘रक्तबीज राक्षसाचा वध’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला. शुभम सोनार, राकेश रामनकाटे व सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. जिवंत देखावा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
