January 20, 2026

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम

0
IMG-20250830-WA0022
Spread the love

संतोष मोतीलाल परदेशी परिवाराची मेहनत भाविकांच्या हृदयाला भिडली,“संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त अनोखा देखावा साकार”.

पुणे: गणपती बाप्पा मोरया! शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवात साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हा देखावा ‘वारी’ या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो.

पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव, संतपरंपरेचे महत्त्व आणि सामूहिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा हा देखावा भक्तांच्या मनात अध्यात्माची नवी जागृती करतो. संस्कृती व अध्यात्माचे सुंदर मिश्रण असलेला हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
परदेशी परिवाराने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले असून, ज्ञानेश्वरी वारकरी परंपरेचा हा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पत्ता : ६१४,शुक्रवार पेठ ओरिएंटल कॉम्प्लेक्स ४था मजला शाहू चौक गणपती मंदिरा शेजारी,पुणे
मोबाईल नंबर ९८२३११२३२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button