महेश गौरव पुरस्कार २०२५ सीए श्रीकिशन भुतडा आणि डॉ. सोनल चांडक यांना जाहीरमहेश प्रोफेशनल फोरमतर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणे : महेश प्रोफेशनल फोरम पुणे संस्थेतर्फे महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजातील उल्लेखनीय व्यक्तींना देण्यात येणा-या महेश गौरव पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा मान इचलकरंजी येथील उद्योजक व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भरीव योगदान देणारे, विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असलेले सीए श्रीकिशन भुतडा आणि अमरावती येथील प्राध्यापिका, समाजसेविका डॉ. सोनल चांडक यांना मिळणार आहे.
श्रीकिशन भुतडा यांना मॅन ऑफ सबस्टन्स तर डॉ. प्रा. सोनल चांडक यांना वुमन ऑफ सबस्टन्स या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे यंदा हे १४ वे वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. २३ आॅगस्ट रोजी सायं. ६ वा. पुणे येथील डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल आॅडिटोरियम येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला एमपीएफ संस्थेच्या १४ शाखांचे सदस्य, एमएफसीटी ट्रस्टचे पदाधिकारी, माहेश्वरी समाजातील मान्यवर तसेच मुख्य प्रायोजक अद्वैत एनर्जी ट्रांजेक्शन लिमिटेड (गुजरात)चे मालक शालीन शेठ, महेश नागरी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी मगराज राठी, महेश सहकारी बँक लिमिटेड चे चेअरमन जुगलकिशोर पुंगलिया आणि वुमन आॅफ सबस्टन्स पुरस्कार प्रायोजक कांता तोष्णीवाल उपस्थित राहणार आहेत. या संदर्भाची माहिती महेश प्रोफेशनल फोरम मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा प्रीती जाजू व कार्यक्रम संचालक राहुल डागा यांनी दिली.