देवस्थानाच्या जमिनींचे संरक्षण करणे ही विश्वस्तांची जबाबदारीयशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड ; पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने कै.ॲड. हेमंत फाटे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालाचे उद्घाटन व वकील संघटनांचा सन्मान
पुणे : देवस्थान इनाम जमिनींच्या बाबतीत देव हा जमिनीचा मालक आहे व वहिवाटदार केवळ मॅनेजर आहे, अस्सा मंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे देवस्थानच्या जमिनींचे संरक्षण करणे ही विश्वस्तांची मोठी जबाबदारी असून त्या जमिनी व ट्रस्ट पुढील पिढीकडे जसेच्या तसे द्यायला हवे, असे मत यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व कुळ कायदा १९५७ मधील देवस्थान जमिनीबाबत तरतुदी याविषयी गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने कै.ॲड. हेमंत फाटे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालाचे उद्घाटन व द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन, दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑप. सोसायटी लि. च्या सर्व पदाधिकारी सभासदांचा सन्मान सोहळा आरटीओ कार्यालयाशेजारील एआयएसएसएमएस च्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर, उपायुक्त डॉ. राजेश परदेशी, सहाय्यक आयुक्त प्रथमेश भोसले व सुधीर कांबळे, एआयएसएसएमएस सहसचिव शिंदे सर, पी टी पी ए पुणे सर्व सदस्य उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांसह सचिव ॲड. जी.बी.गवई, खजिनदार ॲड.विजय टिळेकर, विश्वस्त ॲड.दिलीप हांडे, ॲड. अमृता गुरव, ॲड. मुकेश परदेशी, ॲड. राजेश ठाकूर, ॲड.डी.डी.शहा, ॲड. अमित टकले, ॲड. डॉ. रोहिणी पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संघटनेचे माजी उपाध्यक्ष कै. ॲड. हेमंत फाटे यांच्या पत्नी रुपाली फाटे यांच्याकडे ३ लाख ५५ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देखील सुपूर्द करण्यात आला.
शेखर गायकवाड म्हणाले, भारतामध्ये ६ लाख ५० हजार गावे आहेत. यामध्ये अनेक जमिनी आहेत. जमीन हे असे क्षेत्र आहे की जे शिकणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. मानवी संस्कृती आणि जमिनीचा विकास या दोन्हीचा विकास हा साधारणतः समांतरपणे झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. दिलीप हांडे यांनी स्वागत केले. डॉ. सागर थावरे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. शिवराज कदम यांनी ॲड. हेमंत फाटे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. ॲड. साधना बाजारे यांनी सूत्रसंचालन केले.
- फोटो ओळ : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने कै.ॲड. हेमंत फाटे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालाचे उद्घाटन व वकील संघटनांचा सन्मान सोहळा आरटीओ कार्यालयाशेजारील एआयएसएसएमएस च्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी कै. ॲड. हेमंत फाटे यांच्या पत्नी रुपाली फाटे यांच्याकडे ३ लाख ५५ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देखील सुपूर्द करण्यात आला.
.
