प्रेसनोट प्रसिद्धीसाठीमुद्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश जोशी यांचा सन्मानदि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड पुणे चा १०६ वा वर्धापन दिन ; ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स चे अध्यक्ष सतीश मल्होत्रा यांच्या हस्ते सत्कार

पुणे : दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे आणि अखिल भारतीय मुद्रक फेडरेशनच्या पश्चिम क्षेत्राचे माजी अध्यक्ष प्रकाश जोशी याचा विशेष सन्मान ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स चे अध्यक्ष सतीश मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आला.
दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड पुणेच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेखक अच्युत गोडबोले, प्रमुख मुद्रण व्यावसायिक रवी जोशी, सु. वा. जोशी, संजय घटवाई, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन पुणे चे अध्यक्ष राहुल मारुलकर, उपाध्यक्ष कृष्णा जागडे, चिटणीस किशोर गोरे उपस्थित होते.
प्रकाश जोशी यांनी प्रेस ओनर्स असोसिएशन मध्ये विविध पदे सांभाळून मुद्रण भांडार आणि संघटना यांच्या कार्याला विशेष गती प्राप्त करून दिली. मुद्रण विषयक चतुरस्त्र कार्याबद्दल पूना प्रेस असोसिएशनच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.