राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासावर भरसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी ; ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

पुणे : आजच्या पिढीला जीवनमूल्ये कळावी, याकरिता भारतीय ज्ञान परंपरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघताना विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासावर भर दिला आहे. भारत देश हा ऊर्जा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. पुण्याला संपूर्ण जगभरात वेगळी असून हे शिक्षणाचे माहेरघर असून या क्षेत्राच्या विकासात मोठा वाटा असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.
भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. परिषदेच्या समारोपप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांसह प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ गाभा हा भारतीय तत्वज्ञान आहे. याअंतर्गत भारतातील महापुरूषांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. ज्या देशभक्तांनी देशासाठी आपले प्राण त्यागले, त्यांचा अभ्यास आज शिकविला जात नाही. त्यामुळे आपण प्रेरणा कोणाकडून घ्यायची, हा प्रश्न आहे. त्यामुळे या देशभक्तांविषयी माहिती आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे.
डॉ. गणेश चव्हाण, संतोष रुकारी, मोहन कांबळे, दत्त्तात्रय तापकीर आणि डॉ. संजय तांबट यांनी देखील पहिल्या राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेत मार्गदर्शन केले. पुण्यासह विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभाग घेतला होता.
- फोटो ओळ : भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवर.