सरकारी वकील होण्याकरिता प्रशिक्षण व संशोधन केंद्र पुण्यातजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चा पुढाकार ; माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पुण्यामध्ये केंद्र सुरु होत असून यामध्ये ६ महिन्यांचा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने याकरिता पुढाकार घेतला असून शनिवार, दि.५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोरेगाव पार्क येथील हॉटेल ओ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात केंद्राचे उद्घाटन होईल, अशी माहिती इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.
सरकारी वकील होण्यासाठी परीक्षा तयारी, प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, अभियोजन संचालनालयाचे संचालक अशोककुमार भिलारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अभियोजन संचालनालयाच्या रश्मी नरवाडकर, ममता पाटील, सुप्रिया मोरे – देसाई, वैष्णवी पाटील, आनंद नारखेडकर, संगीता ढगे आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरकारी वकील होण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींविषयी व प्रशिक्षणाच्या विषयावर सर्व मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सरकारी वकिली क्षेत्रातील आव्हाने आणि संधी याविषयावर विचारमंथन या कार्यक्रमात होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होत असून सरकारी वकिलांचे १०० प्रमुख आणि विधी महाविद्यालयातील ४० निवडक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सरकारी वकील होण्याकरिता ६ महिन्याचा कोर्स सुरु होत यांच्या दोन लेव्हल असणार आहेत. त्याचे मान्यवरांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल, असेही त्यांनी सांगितले.