श्री गौड ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षपदी राकेश शर्मा यांची निवड

पुणे : श्री गौड ब्राह्मण समाज व श्री गौड नवयुवक मंडळ यांच्या अध्यक्षपदी राकेश मोतीलाल शर्मा यांची वार्षिक सभेत एकमताने निवड करण्यात आली आहे. ही सभा बिबवेवाडी येथील के.के. मार्केट जवळ असलेल्या श्री गौड ब्राह्मण समाज मंदिरात सभा पार पडली.
राकेश मोतीलालजी शर्मा यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू असून, समाजहितासाठी ते विविध उपक्रम राबवत आले आहेत. भव्य रामकथा व श्रीमद् भागवत कथेचे यशस्वी आयोजन श्री गौड ब्राह्मण समाजाने त्यांच्या नेतृत्वाखाली केले होते.
श्री गौड ब्राह्मण समाज पुण्यामध्ये १५० पेक्षा अधिक वर्षांपासून स्थायिक आहे. समाजातील सदस्य अनेक क्षेत्रात कार्यरत असून व्यवसायामध्ये देखील सक्रिय आहेत. समाजातर्फे केवळ धार्मिक, सांस्कृतिक नाही, अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.