रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज छत्तीसगढ चे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांची

आज रायपूर मधील मुख्यमंत्री कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली.छत्तीसगढ राज्य सरकार च्या विविध महामंडळात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सदस्य संचालक पदे देऊन सत्तेचा वाटा द्यावा याबाबत चर्चा झाली. छत्तीसगढ मधील प्रत्येक जिल्ह्यात ओल्डेज होम सुरू करण्याबाबत चर्चा झाली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अभिषेक वर्मा; विजय प्रसाद गुप्ता; उषा आफळे; यशवंत ठाकरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.