अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठीरिपब्लिकन पक्षाच्या वतीने दि .4 जुलै रोजी मुंबईतगेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्चकेंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणारअनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार

मुंबई दि.1 ~ अहमदाबाद मध्ये एयर इंडियाच्या जंबो जेट विमान अपघातात 240 लोक मृत्युमुखी पडले. या अत्यंत भीषण अपघातात मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात येत्या दि.4 जुलै रोजी सायंकाळी 6वाजता मुंबईत रेडिओ क्लब ते गेट वे ऑफ इंडिया असा कॅन्डल मार्ग काढण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च मध्ये बॉलिवूड चे अनेक सेलिब्रिटी कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी अभिनेत्री संगीता कापूरे आणि अभिनेते गौरव शर्मा हे प्रयत्नशील आहेत.या कॅन्डल मार्च मध्ये मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनीही केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित या कॅन्डल मार्च च्या नियोजनाची बैठक बांद्रा येथे आज घेण्यात आली.त्यात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार; खजिनदार सुनील मोरे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे; जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड;प्रकाश जाधव संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चा ला येत्या दि 4 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईत रेडिओ एन क्लब येथून सुरुवात होणार असून. गेट वे ऑफ इंडिया येथे समारोप करण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च मध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च चे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले करणार आहेत.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे अभिनेत्री संगीता कपूरे गौरव शर्मा सिद्धार्थ कासारे सर्व रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख