July 2, 2025

श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला सुरुवातभक्तीरसपूर्ण वातावरणात धार्मिक विधींचे आयोजन

0
IMG-20250630-WA0065
Spread the love

पुणे : जगत्‌‍गुरू श्रीमान मध्वाचार्य मूळ महासंस्थानतर्फे श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला आज (सोमवार, दि. 30 जून) भक्तीरसपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या महोत्सवानिमित्त श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रायल (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांचे आगमन झाले आहे.
आराधना महोत्सवानिमित्त मठाच्या आवारातील श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या समाधीस विशेष महापूजेने पुष्पालंकारित करण्यात आले आहे.
सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील नंजनगूडु श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे या तीन दिवसीय आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आराधना महोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी ध्वजारोहण, प्रार्थनाउत्सव, गौपूजा आणि धनधान्य पूजा करण्यात आली. तर आज (दि. 30) पहाटे साडेपाच पासून सुप्रभात, निर्माल्यसेवा, पंचामृतपूजा, अलंकारपूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आराधना महोत्सवाला सुरुवात झाली. आराधना महोत्सवास पुण्यासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांची पाद्यपूजा करण्यात आली तसेच तप्त मुद्रा धारण सोहळा झाला. श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांच्या हस्ते सभामंडपात श्री मूलरामाची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. सायंकाळी कुमारी अभिज्ञा रघुनंदन यांनी दासवाणी सेवा रुजू केली. त्यानंतर मठाच्या आवारात रजत रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 1 आणि दि. 2 जुलै रोजीही सकाळी 5:30 ते सायंकाळी 8 या वेळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 1 जुलै रोजी पंडित रघुनंदन पणशीकर यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायन आणि दि. 2 जुलै रोजी कृती नरसिंम्हाचार कुर्डी दासवाणी सादर करून आपली सेवा रुजू करणार आहेत. हे सांस्कृतिक सायंकाळी 6 ते 7 या वेळात होणार आहेत.

फोटो ओळ : (P1013198/205/207) : श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांची पाद्यपूजा करून शुभाशीर्वाद घेताना भाविक.
फोटो ओळ : (P1013231/241/248) : श्री मूलरामाची पूजा करताना श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु.
फोटो ओळ : (P1013220) : श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या समाधीची पुष्पालंकारित महाजूपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button