January 19, 2026

धोकादायक इमारतीत चालणाऱ्या ऑर्किड शाळेवर महापालिकेच्या आयुक्तांकडून बंदी

0
IMG-20250611-WA0066
Spread the love


भवानी पेठेतील जय हाउसिंग सोसायटीत भरवली जाणारी अनाधिकृत शाळा ऑर्किड स्कूलवर लवकरात लवकर पालखीकडून बुलडोजर चालवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे अनेक वेळा नोटीसा देऊ नये ही शाळा कोणत्याही परवानगीशिवाय सोसायटीच्या आवारात अत्यंत धोकादायक अशा इमारतीत भरवल्या जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा चालक संचालक यांच्याकडून कोणतीही खबरदारी न घेता या परिसरात शाळा भरते या विरुद्ध जय हौसिंग सोसायटीतील सदस्य रहिवासी यांनी महापालिकेचा शिक्षण विभाग बांधकाम विभाग यांच्याकडे शेकडो तक्रारी यादी दिल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून धोकादायक इमारतीला पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांना ही शाळा पालिका शाळा चालकांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यात आला पालिकेने आणि सीईओपीच्या दोन्ही अहवालात शाळा भरते ती इमारत धोकादायक असल्याचं निदर्शनात आला आहे यावर पुणे महानगरपालिकेने आता कंबर कसली असून शाळा सुरू होण्याआधी धोकादायक इमारतीवर कारवाई होणार असल्याचे पालिका आयुक्त यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button