July 2, 2025

ग्राहक पेठेच्या वतीने ‘संस्कारक्षम वह्या’ उपक्रममुखपृष्ठावर थोर पुरुषांची आणि पर्यावरणविषयक चित्रे

0
IMG-20250610-WA0041
Spread the love

पुणे : शालेय वह्यांवरील संस्कारक्षम मुखपृष्ठांच्या माध्यमातून ग्राहक पेठ अनेक वर्षे ‘संस्कारक्षम वह्या’ असा उपक्रम राबवित आहे. आजच्या काळात वह्यांवर विविध अभिनेता-अभिनेत्रींची चित्रे असतात. मात्र, वह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, हा ग्राहक पेठेचा प्रयत्न आहे. मुखपृष्ठावर थोर पुरुषांची आणि पर्यावरणविषयक चित्रे असलेल्या वह्या ग्राहक पेठेत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद अशा थोर पुरुषांची चित्रे मुखपृष्ठावर असलेल्या वह्या उपलब्ध आहेत. तसेच यंदा पर्यावरणावरील समतोल राखा, सेव्ह ट्री, व्यायाम हा आरोग्याचा मूलभूत पाया, एक पाऊल स्वच्छतेकडे, जल है तो कल है, मोबाईलवरील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा, अशा प्रकारचे विविध सामाजिक संदेश देणार्‍या वह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत.

तसेच आई-वडिलांचे कष्ट अधोरेखित करणारी मुखपृष्ठ असलेल्या वह्या या वेळी विशेषत्वाने विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. मुलांकरिता खास विद्यार्थी दालन करण्यात आले असून त्यामध्ये वह्यांमधील प्रकार ग्राहक पेठेमध्ये आहेत. या वह्या सवलतीच्या दरात देण्यात येत आहेत. याबरोबरच उत्तम क्वालिटीचे लंच बॉक्स, वॉटर बॉटल्स्, विविध प्रकारच्या छत्र्याही रास्तदरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सूर्यकांत पाठक म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना थोर पुरुषांची चित्रे पाहून त्यांचा आदर्श घ्यावा. मुखपृष्ठावरील विविध संदेशांप्रमाणे अनुकरण करावे आणि प्रत्यक्ष कृतीतदेखील त्यांच्याकडून चांगले वर्तन घडावे यासाठी हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button