Harrier.ev ने SUVs च्या एका धाडसी, नव्या लीगची सुरुवात केली

~ भारताची, भारतात बनवलेली सगळ्यात दमदार SUV, 21.49 लाख रु. पासून*
ठळक वैशिष्ट्ये
सुपरकारसारखा परफॉर्मन्स अनुभवा
o पुढच्या बाजूस 158 PS (116 kW)ची ड्युअल मोटर शक्ती आणि 238 PS (175 kW)
o ड्युअल मोटर सेटअपमधून 504 Nm टॉर्क
o 6.3 सेकंदात 0–100 km/h – सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ
o 75 kWh बॅटरी द्वारा संचालित, ज्यामुळे 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 250 km इतकी रेंज देते. त्यामुळे SUV सह कुठेही ऑफ-रोड जाण्याच्या क्षमतेचा आनंद अनुभवा
o क्वॉड व्हील ड्राइव्ह सिस्टमसह अप्रतिम ऑफ-रोड अनुभव मिळवा
o सहा टेरेन मोड असल्यावर काहीच अशक्य नाही, यामुळे कुठेही बिनधास्त जाण्याचा विश्वास मिळतो
o ट्रान्सपरंट मोड सह आसपासचे आणि खालचे देखील बघू शकता
सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आरामदायकता
o असामान्य हाताळणी आणि चालवण्याच्या कम्फर्टसाठी फ्रिक्वन्सी डिपेन्डन्ट डॅम्पिंगसह अल्ट्रा गाइड सस्पेंशनवर तरंगत जा
o जगातील पहिली हरमनची 36.9 सेमी (14.53”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जी सॅमसंग निओ QLED द्वारा संचालित आहे. हा जगातील पहिला निओ QLED ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे, यात JBL ऑडिओ मोड आणि डॉल्बी अॅटमॉस सह JBL ब्लॅक 10 स्पीकर सिस्टम आहे, जी थिएटर Maax अनुभव देते.
o ई-व्हॅले, डिजी अॅक्सेस आणि ड्राइव्हपे सह तुमच्या हातात सुविधेचे बळ
ही गाडी ICE संचालित हाय SUV च्या किंमतीत दमदार ताकद, स्वच्छंदतेने फिरण्याची क्षमता आणि लक्झरी सेगमेन्टच्या विशेषता यांचा संयोग घडवते
मालकीच्या मुक्त अनुभवासाठी बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे
मुंबई, 03 जून 2025: भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीत अग्रणी आणि देशातील आघाडीचा SUV उत्पादक TATA मोटर्सने आज Harrier.ev लॉन्च केली, जी भारतातील सर्वात दमदार, सर्वात सक्षम आणि आत्तापर्यंतची सर्वात बुद्धिमान SUV आहे. भविष्याच्या SUV ला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने तयार केलेली Harrier.ev एक नवीन मानसिकता घेऊन आली आहे, जिच्यात क्षमता आणि आधुनिकता यांचा सुमेळ साधला आहे. ही अशी SUV आहे, जी तुमच्यापुढे साहस आणि शौक यांच्यात निवड करण्याचा पेच टाकत नाही; कारण या SUV मधून दोन्ही मिळू शकते. अज्ञात प्रांतात मुशाफिरी करण्यापासून ते शहरी भागात फिरण्यापर्यंत Harrier.ev तुम्हाला बेजोड लक्झरीच्या सुरक्षित कोशातून प्रवास घडवते. 504 Nm टॉर्क आणि QWD ड्युअल-मोटर सह,
Harrier.ev एक देशात विकसित करण्यात आलेली आजवरची श्रेष्ठ SUV आहे. चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या Harrier.ev ची किंमत 21.49 लाख रु.* पासून सुरू होत आहे.
नेक्स्ट जनरेशनच्या acti.ev+ प्युअर EV आर्किटेक्चर द्वारा संचालित असलेली ही SUV एकमेवाद्वितीय अशी गाडी आहे. बूस्ट मोडमध्ये केवळ 6.3 सेकंदात ताशी 0-100 किमी इतका वेग गाठण्याची क्षमता तिच्यात आहे. यामधील सहा प्रगत असे टेरेन मोड आणि असामान्य ग्राउंड क्लियरन्स यामुळे फारसे लोक न पोहोचलेल्या दुर्गम ठिकाणी ही गाडी घेऊन जाता येते. आणि अशा दुर्गम प्रांतात फिरताना देखील गाडीत बसलेले प्रवासी प्रवासी आलीशान झेनिथ स्वीटमध्ये असल्याच्या थाटात राहू शकतील. शिवाय यामध्ये काही फीचर इतकी प्रगत आहेत की, ती केवळ या सेगमेन्टमध्ये किंवा उद्योगात पहिली नाहीत, तर जगात पहिली आहेत. टाटा मोटर्सद्वारा निर्मित ही सर्वात बुद्धिमान SUV आहे. हॅंड्स फ्री अनलॉकिंगसाठी अल्ट्रा वाइड बॅंडचा उपयोग करून डिजी अॅक्सेस पासून ते ई-व्हॅले, आणि गाडीच्या खाली काय आहे, हे देखील दाखवणाऱ्या 540° सराऊंड व्ह्यू सिस्टमपर्यंतची सगळी फीचर्स सामावणारे हे टेक-फर्स्ट उत्पादन फक्त चालकाला मदत करण्यासाठी बनवलेले नाही तर त्याच्याकडून अधिक अपेक्षा करावी इतके ते सक्षम आहे.
शिवाय, बॅटरी टेक्नॉलॉजीची परिपक्वता आणि मालकीचा सहज अनुभव याबाबतचा आपला विश्वास अधोरेखित करत टाटा मोटर्सने Harrier.ev च्या बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे. त्यामुळे EV समुदायाला एक निश्चिंतता मिळेल.
भारतात बनवलेली सर्वात दमदार SUV लॉन्च करताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे मॅनिजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा म्हणाले, “1990 च्या दशकात विशिष्ट नेमप्लेट्सद्वारे SUV सेगमेन्टची ओळख निर्माण करणारा आणि 2020 च्या दशकात नवीन आणि कुणीही न पोहोचलेल्या जागेत सर्वांसाठी धाडसाने प्रवेश खुला करणारा आमचा प्रवास नेहमी इनोव्हेशन आणि नेतृत्त्वाने प्रेरित आहे. Harrier.ev च्या लॉन्च सह आम्ही केवळ एक नवीन इलेक्ट्रिक SUV लॉन्च करत नाही आहोत, किंवा परंपरेला आव्हान देत नाही आहोत, तर आम्ही काय शक्य होऊ शकते याचे नियम नव्याने लिहीत आहोत. महान परंपरेत जन्मलेली आणि भविष्याचा विचार करून तयार केलेली Harrier.ev ही भारताची सर्वात सक्षम SUV आहे.
अत्याधुनिक acti.ev+ आर्किटेक्चरने बनलेली आणि सर्वोत्तम टॉर्क निर्माण करणाऱ्या, आणि भारतीय SUV क्षेत्रात आजवरचे सर्वश्रेष्ठ अॅक्सेलरेशन देणाऱ्या दमदार QWD द्वारा संचालित Harrier.ev परफॉर्मन्सची नव्याने व्याख्या करते. या जबरदस्त ताकदीला सॅमसंग निओ QLED द्वारा संचालित हरमनचा डिस्प्ले, श्रोत्याला तल्लीन करणारी डॉल्बी अॅटमॉस प्रणाली आणि सभोवतालचे आणि अगदी गाडीच्या तळाच्या खालचे देखील दाखवणारी 540° सराऊंड व्हयू सिस्टम यांसारख्या SUV सेगमेन्टमधील श्रेष्ठ लक्झरीजची जोड आहे. बुद्धिमत्ता, ऐशोआराम आणि उद्देशाने प्रेरित होऊन बनवलेली Harrier.ev रेंज अॅंग्झायटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादेची चिंता दूर करते आणि EV ची मालकी केवळ प्रेरणादायकच नाही, तर सहजसाध्य बनवते. गतीशीलतेच्या भविष्याकडे चालू झालेल्या भारताच्या प्रवासाचे नेतृत्व करण्याची आणि भारतीय ऑटोमोटिव्ह क्षमतेच्या शब्दसंपदेमधून ‘डिलीट इम्पॉसिबल’ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे Harrier.ev आहे.”
*प्रारंभिक किंमत, एक्स-शोरूम, मुंबई या किंमतीत चार्जर आणि इन्स्टॉलेशनची किंमत समाविष्ट नाही. चार्जर पर्याय सशुल्क मिळवता येतील.
Harrier.ev विषयी अधिक जाणून घ्या
सुपरकार सारखा परफॉर्मन्स अनुभवा
acti.ev+ आर्किटेक्चर द्वारा समर्थित Harrier.ev विविध प्रकारच्या प्रांतात बेजोड एक्सेलरेशन, नियंत्रण आणि आत्मविश्वास देते. शहरातल्या दैनंदिन प्रवासापासून ते ऑफ रोडिंग करताना Harrier.ev त्यातील प्रगत क्षमता आणि सुपरकार सारख्या परफॉर्मन्ससह एक अधिकाराचा अनुभव देते.
● पुढच्या बाजूस 158 PS (116 kW)ची ड्युअल मोटर शक्ती आणि 238 PS (175 kW )
● ड्युअल मोटर सेटअपमधून 504 Nm टॉर्क
● 6.3 सेकंदात 0–100 km/h – सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ
● मोठ्या रेंजचे 65 kWh आणि 75 kWh बॅटरी पॅक्स
● C75 च्या अनुमानानुसार, प्रत्यक्षात 480-505 किमी रेंज
● 1.5 C वर फास्ट चार्जिंगमुळे केवळ 15 मिनिटांत 250 किमी जाण्याची क्षमता मिळते
SUV सह कुठेही ऑफ-रोड जाण्याच्या क्षमतेचा आनंद अनुभवा
Harrier.ev मध्ये ताकदीबरोबर अशी साधने देखील आहेत, जी गाडीत बसलेल्यांना रस्त्यांची चिंता न करण्याचा आत्मविश्वास देतात. शहरातल्या गर्दीतून वाट काढायची असो किंवा ओबडधोबड, खडबडीत रस्त्यावरून फिरणे असो Harrier.ev त्यातून मार्ग काढेलच आणि पारंपरिक SUVच्या मर्यादांना न जुमानता कुठेही जाईल.
● सहा टेरेन मोड: नॉर्मल, ग्रास/स्नो, मड/ग्रॅव्हेल (खडी), सॅंड, रॉक क्रॉल, कस्टम
● बूस्ट मोड, ड्रिफ्ट मोड आणि क्रूझ नियंत्रणासह ऑफ रोड असिस्ट (ताशी 5 किमी इतका कमी)
● वाहनाच्या खाली काही अडथळा असल्यास तो बघण्यासाठी ट्रान्सपरंट मोड
सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आलीशान आरामदायकता
अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि महत्तम लक्झरीचा सुंदर सुमेळ साधून बनवलेली Harrier.ev प्रत्येक ड्राइव्ह अधिक स्मार्ट आणि अधिक निर्बाध बनवते आणि वाहन तुमचे किती लाड पुरवू शकते हे व्याख्यायित करते. अंतर्ज्ञानी इंटरफेसपासून ते जगातील आणि या सेगमेन्टमध्ये पहिल्यांदाच वापरलेल्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज Harrier.ev फक्त एक SUV नाही, तर तो एक अनुभव आहे, ज्यात इनोव्हेशन आणि ऐश्वर्य यांचा सुमेळ साधला आहे.
- ई-व्हॅले
a. ऑटो पार्क असिस्ट (APA): APA तुमच्या वाहनाला, तुमच्या आदेशानुसार समांतर किंवा लंब स्थानी घेऊन जाते. एनिव्हेअर पार्किंग – या सेगमेन्टमध्ये पहिल्यांदाच आलेले इनोव्हेशन – त्यास एक पाऊल पुढे घेऊन जाते. ते तुम्हाला पारंपरिक ठरलेल्या जागांची गरजेला न जुमानता कस्टम पार्किंग जागा ठरवण्याची मुभा देते. ही पुढच्या पिढीची टेक्नॉलॉजी जेथे पार्किंगसाठी रेषा केलेल्या असतील, तेथेच नाही, तर जेथे सुरक्षित आणि अनुकूल असेल, अशा ठिकाणी पार्किंग करण्याचे स्वातंत्र्य देते.
b. रिव्हर्स असिस्ट: आपसूक रिव्हर्समध्ये नेमका मार्ग आखून देते (अंतिम 50 मीटर पर्यंत), कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला निमुळत्या जागेतून बाहेर काढते.
c. समन मोड: Harrier.ev ला दुरूनच पुढे किंवा मागच्या दिशेने बोलावण्यास तुम्हाला मदत करतो. कमी जागा असेल अशा ठिकाणी हा मोड अत्यंत उपयुक्त ठरतो.
- क्लियर व्ह्यू असिस्ट
a. 540 डिग्री सराऊंड व्ह्यू
i. 360 सराऊंड व्ह्यू मॉनिटर: ड्रायव्हिंग करताना सगळ्या बाजूंचा परिसर स्पष्ट बघा. व्यवस्थित बघा, हुशारीने गाडी चालवा आणि आत्मविश्वासाने पार्क करा.
ii. ट्रान्सपरंट मोड: आपल्या गाडीच्या खाली काय आहे हे बघा. ऑफ-रोड प्रदेश असो, खड्डे असोत किंवा काही अवरोध असो, पाहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने आणि नेमकेपणाने नेव्हीगेट करा.
iii. ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर: तुमच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंच्या ब्लाइंड स्पॉटचा लाईव्ह व्हिडीओ फीड देतो, जो थेट तुमच्या इन्फोटेन्मेंट स्क्रीनवर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर प्रदर्शित होतो.
b. HD रियर व्ह्यू मिरर (e-IRVM): पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंचा एक सुस्पष्ट व्ह्यू मिळवा, कोणत्याही अवरोधाशिवाय- मग प्रवासी किंवा त्यांचे सामान तुमच्या दृष्टीक्षेपास अवरोधित करत असले तरीही. इंटिग्रेटेड स्मार्ट मिरर एक बिल्ट-इन डॅश-कॅम म्हणून देखील काम करतो, जो निरंतर फुल HD मध्ये रेकॉर्डिंग करतो. समोरच्या बाजूस 1920×1080 आणि मागील बाजूस 1920×384. 128GB पर्यंतच्या स्टोरेजच्या पाठबळावर तो कित्येक तासांचे ड्रायव्हिंग फूटेज टिपतो. या क्लिप्स शेअर करणे किंवा सेव्ह करणे सोपे आहे. आपल्या फोनवर थेट व्हिडिओ अॅक्सेस करण्यासाठी फक्त मिररवर दिलेला QR कोड स्कॅन करावा लागतो.
- डिजी अॅक्सेस
a. डिजिटल की: Harrier.ev सह तुमचा आयफोन, अॅपल वॉच किंवा कम्पॅटिबल अँन्ड्रॉईड फोन तुमची स्मार्ट की बनतो. आता प्रत्यक्ष किल्ली सोबत बाळगण्याची गरज नाही. अल्ट्रा वाइड बॅंड (UWB) टेकनिक मुळे वाहन तुम्ही किती जवळ आहात हे ओळखते, त्यामुळे आपल्या डिव्हाईसला हात न लावताच तुम्ही लॉक, अनलॉक आणि ड्राइव्ह करू शकता. हा एक अत्यंत सहज आणि खराखुरा हॅंड्स-फ्री अनुभव आहे. कारच्या हॅंडलवर आपला फोन टॅप करण्याची पूर्वीची आवश्यकता देखील आता उरलेली नाही.
b. स्मार्ट की: तुमची स्लीक, जागा वाचवणारी बॅकअप की तुम्हाला सहजपणे आपली गाडी लॉक करण्याची, अनलॉक करण्याची आणि अगदी सुरू देखील करण्याची सुविधा देते.
c. रिमोट की: यात तुमच्या बोटांमध्येच लॉकिंग आणि अनलॉकिंगपासून ते रिमोट पार्क आणि समन मोड पर्यंतचे 11 शक्तिशाली कमांड आहेत.
- थिएटर Maax अनुभव
a. सॅमसंग निओ QLED द्वारा संचालित हरमनची 36.9 सेमी (14.53″) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जो जगातील पहिला निओ QLED ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे.
b. जगातील पहिला JBL ब्लॅक: दमदार आणि मोक्याच्या जागी बसवलेले 10 JBL ब्लॅक स्पीकर JBL ऑडिओ मोडसह एका इमर्सिव्ह अनुभवासाठी ट्यून करण्यात आले आहेत.
c. डॉल्बी अॅटमॉस: कलाकाराला अपेक्षित असेल अशा स्पष्टतेने ऐका – गाडीतून फिरताना देखील. एखादा हळुवार बोललेला संवाद असो किंवा गुंतागुंतीचा साऊंडस्केप, प्रत्येक बारकावा समृद्ध स्पष्टता आणि गहिरेपणाने सजीव होतो.
d. कार अॅप स्वीटमध्ये Arcade.ev: ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्याकडे इन्फोटेन्मेंट सिस्टम (25+ अॅप) मार्फतच अनेक प्रकारच्या अॅपपर्यंत तत्काळ पोहोच असते. त्यामुळे प्रवासात असताना संगीत, पॉडकास्ट, FM रेडिओ, OTT कंटेंट आणि बऱ्याच गोष्टींचा निर्बाध आनंद घ्या.
- बिल्ट-इन नेव्हीगेशन – Mappls: अनेक फीचर्सनी युक्त, विस्तृत मॅप्ससह सुरक्षित आणि कुशलतेने नेव्हीगेट करा. हे मॅप झटपट अपडेट होतात आणि ऑफलाइन देखील उपलब्ध आहेत. खास इलेक्ट्रिक वाहनांसाठी डिझाईन केलेल्या या सिस्टममध्ये स्पायडर रेंज व्हिज्युअलायझेशन, बॅटरी-सक्षम रूटिंग आणि आसपासच्या चार्जिंग स्टेशन्सचा रियल-टाइममध्ये शोध यांसारख्या EV-विशिष्ट सुविधा समाविष्ट आहेत. तुमच्या वर्तमान चार्जच्या स्थितीनुसार (SOC) ते तुम्हाला जवळचे चार्जर्स देखील सुचवते आणि ही खातरजमा करते की, तुम्ही सदैव आपल्या पुढील टॉप-अपच्या टप्प्यात असाल.
- iRA.ev:
a. 55+ कनेक्टेड कारची वैशिष्ट्ये उदय. कार लोकेशन ट्रॅकिंग, लोकेट चार्ज पॉइंट अॅग्रीगेटर्स, रिमोट ऑपरेशन इ.
b. ड्राइव्हपे: भारतातील पहिल्या इन-कार UPI-आधारित पेमेंट प्रणाली सह खऱ्याखुऱ्या सुविधेचा अनुभव घ्या, जी EV चार्जिंग आणि FASTag साठी सुरक्षित, निर्बाध आणि अनुपालन ट्रान्झॅक्शन सक्षम बनवते. चार्जिंग स्टेशन शोधा, निर्णय घ्या आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा – हे सगळे आपल्या कारच्या इंटरफेसवरून करा, आपल्या फोनचा वापर न करता.
c. 4 वर्षांच्या कॉम्प्लिमेंटरी सब्स्क्रिप्शन सेवांसह
- Acti.ev+: टाटा मोटर्सचे acti.ev आर्किटेक्चर हर तऱ्हेने प्रगत बनवले आहे. जेणेकरून ते Harrier.ev मध्ये acti.ev+ बनू शकेल.
a. लेयर 1: पॉवरट्रेन: QWD आणि RWD चा समावेश, 75 kWh बॅटरी पॅक, जलद 1.5C चार्जिंग आणि बदलता येणारे टेरेन मोड.
b. लेयर 2: चेसिस: FDD सह अल्ट्रा गाइड सस्पेन्शन, अधिक चांगली क्रॅश कामगिरी, उन्नत ड्रायव्हिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मोड्सची सुरुवात
c. लेयर 3: एलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: t.idal, टाटा इंटेलिजन्ट डिजिटल आर्किटेक्चर लेयर द्वारा संचालित, यांचे SDV फाऊंडेशन acti.ev+ आर्किटेक्चरवर बनवण्यात आले आहे. सुरक्षा, मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी सहजपणे एकीकृत करण्यासाठी बनवण्यात आलेले t.idal 500 मिलियनपेक्षा जास्त लाईन्सचे कोड आणि अत्याधुनिक डोमेन नियंत्रकांद्वारे संचालित आहे. निओ QLED ऑटोमोटिव्ह डिस्प्ले, बहुभाषिक व्हॉईस रेकग्निशन आणि Mobileye EyeQ सह ADAS द्वारा संचालित, या उद्योगातील प्रथम हरमन इन्फोटेन्मेंट, ओव्हर-द-एअर अपडेट्स आणि डिजिटल की इंटिग्रेशनपर्यंत, t.idal Harrier.ev चे खरोखर एका बुद्धिमान सॉफ्टवेअर-व्याख्यायित SUV मध्ये रूपांतर करतो.
d. लेयर 4: क्लाउड आर्किटेक्चर: नावीन्यपूर्ण डिजी अॅक्सेस आणि पूर्वीपेक्षा सुधारित Arcade.ev
झेनिथ स्वीट – लक्झरीची नवी व्याख्या
Harrier.ev हा चार चाकांवर चालता-फिरता प्रीमियम लाउंज आहे, जो कम्फर्टला एका नव्या पातळीवर घेऊन जातो. या झेनिथ स्वीटमध्ये अद्भुत डीटेलिंग आणि विचारपूर्वक केलेले एर्गोनॉमिक्स आहे, जे प्रत्येक प्रवासास एक आलिशान अनुभव बनवते.
● मेमरी सीट्स आणि ORVM
● पॉवर्ड आणि हवेशीर फ्रंट सीट्स
● वाढीव रियर लेगरूमसाठी पॉवर BOSS मोड
● रियर कम्फर्ट हेडरेस्ट आणि कप-होल्डर्स सहित सेंटर आर्मरेस्ट
● व्हॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ
या प्रीमियम सुविधानणा अंतर्ज्ञानी सोयींची जोड आहे:
● कूल्ड स्टोरेज आणि एअर प्युरिफायरसहित ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल
● ड्राइव्ह मोड आणि संगीत यांना अनुरूप आतले लाइटिंग
● वायरलेस चार्जिंग आणि 65W USB फास्ट चार्जर्स
● प्रायव्हसी आणि प्रकाशाची तीव्र चमक कमी करण्यासाठी रियर सनशेड्स
● व्हेइकल-टू-लोड (V2L) आणि व्हेइकल-टू-व्हेइकल (V2V) पॉवर शेअरिंग
● 502 लीटरची बूटस्पेस, जी 999 लीटर पर्यंत वाढवता येते.
● RWD मध्ये 67 लीटर आणि AWD मध्ये 35 लीटर फ्रंक
अत्यंत विश्वासार्ह – सुरक्षा, जी या क्षेत्रात सर्वाधिक
टाटा मोटर्सच्या सेफ्टी DNA ला पुढे घेऊन जात, Harrier.ev इंटेलिजन्ट असिस्टंस आणि दमदार सुरक्षा फीचर्सची एक व्यापक ईकोसिस्टम प्रदान करते.
● डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर सह HD रियर व्ह्यू मिरर (e-IRVM)
● 7 एअरबॅग्स (6 नेहमीच्या + नी एअरबॅग)
● 20+ फीचर्स सह ADAS लेव्हल 2
● 540° क्लियर व्ह्यू असिस्ट आणि 360° 3D कॅमेऱ्यासह ट्रान्सपरंट मोड
रस्त्यावरील सुरक्षा आणि आत्मविश्वासात वाढ:
● i-VBAC सह ESP
● अॅकॉस्टिक व्हेइकल अलर्ट सिस्टम (AVAS)
● SOS कॉलचे फंक्शन
● हिल डिसेंट कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट
● TPMS आणि ऑटो हेडलॅम्प सह रेन-सेन्सिंग वाईपर्स
आकर्षक रंग पट
बोल्डनेस आणि एलिगन्सने परिपूर्ण असलेली Harrier.ev मध्ये चार आकर्षक रंगांचे पर्याय आहेत – नैनीताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टीन व्हाइट आणि प्युअर ग्रे. शिवाय, ही SUV समीक्षकांनी वाखाणलेल्या STEALTH आवृत्तीत देखील उपलब्ध असेल- एक गडद, अधिक आक्रमक व्हिज्युअल ओळख, जी तुमची नजर खिळवून ठेवेल.
-समाप्त-