मा. अमोल झेंडे साहेब,पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे.विषय – रुपाली, वैशाली हॉटेल समोरील नो पार्किंग बाबत…मा. महोदय,

गोपाळकृष्ण गोखले रस्ता ( फर्ग्यूसन रस्ता ) हा एकेरी वाहतुकीचा मार्ग असून 10/12 वर्षांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फ़ोट झाले होते त्यावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून ह्या रस्त्यावर ( फर्ग्यूसन रस्त्यावर ) रुपाली आणि वैशाली हॉटेल समोर नो पार्किंग चा निर्णय घेण्यात आला.
मात्र त्याचा आजपर्यंत कोणीच आढावा घेतला नाही.
काळानुरूप त्याची आता आवश्यकता आहे की नाही याबाबत पोलीस खाते किंवा मनपा प्रशासन असे कोणीही विचार केला नाही.
ह्या प्रचंड वर्दळीच्या वाहत्या रस्त्यावर केवळ याच दोन ठिकाणी नो पार्किंग चे प्रयोजन काय.?
मुळात तेथेही रोज वाहने लागतात किंवा मालक आत गेला तर वाहनचालक गाडीत बसून असतो, तेथे नो पार्किंग ची दैनंदिन/ सतत कारवाई होत नाही, एखादा भूला भटका दंडासाठी सापडतो.
तरी ह्या नो पार्किंगचा पुनर्विचार करावा अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
प्रवक्ता, भाजपा.
महाराष्ट्र प्रदेश.
मो – 9850999995