सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विचारपूस

जखमींना लवकर आराम मिळावा; यासाठी आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या डॉक्टरांना सूचना
पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने दिलेल्या धडकेतील १२ पैकी तिघांची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करुन; लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. तसेच डॉक्टरांना ही तिघांवर उत्तमोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
शनिवारी रात्रीच्या सुमारास पुण्यातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील एका चहा दुकानात भरधाव कार घुसली. या अपघातात १२ जण जखमी झाले असून; तीनजणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज तिघांचीही रुग्णालयात भेट घेऊन; तब्येतीची विचारपूस केली. तसेच, तिघांना लवकर आराम मिळावा, यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करावेत, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, यावेळी नामदार पाटील यांनी सदर घटनेच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला. कारमालक, चालक आणि त्याच्या सोबतच्या सहप्रवाशाला ताब्यात घेतलं असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांनी दिली.