July 2, 2025

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने बाल पुस्तक जत्रेत मुलांसाठी 12 हजार मिलेट फूड पॅकेटचे मोफत वाटप

0
IMG-20250523-WA0016
Spread the love

मिलेट पदार्थांच्या जनजागृतीसाठी मिलिमोचा पुढाकार

पुणे : पालकांच्या धकाधकीच्या जीवनशैली मुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. फास्ट फूड, रेडी टू कुक आहे म्हणून मैदायुक्त पदार्थांचा अनेकदा लहान मुलांच्या खाण्यात जास्त वापर होताना दिसतो, मात्र या पदार्थांचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम   काय असेल? यांचा विचार पालक करताना दिसत नाहीत. यामुळेच पालक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सुरू असलेल्या बाल पुस्तक जत्रेत तब्बल 12 हजार मिलिमो फूड पॅकेटचे मोफत वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी राजेश पांडे उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्टॉलला भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.  

याविषयी बोलताना सोनाई एक्सपोर्ट प्रा. लि. च्या संचालिका तृप्ती पाटील  म्हणाल्या, मिलिमो म्हणजे मिलेट्स मदर, मी एक आई आहे, लहान मुलांना खायला देताना ते पौष्टिक असावे असा माझा आग्रह होता, यामुळे फास्ट फूड किंवा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक त्यांना दिल्या जाणारया खाद्य पदार्थात असू नये असे मला वाटत होते. यातूनच मिलिमो चा जन्म झाला. आम्ही ज्वारी, बाजारी, नाचणी पासून मुलांसाठी चवदार आणि पौष्टिक पदार्थांची निर्मिती करत आहोत, न्यूडल, कुरकुरे, बिस्किट, पफ, कुकीज  यासोबतच  मुलांच्या आईला रेडी टू कुक मिळावे यासाठी आम्ही रेडी मिक्स डोसा, आंबोळी, पॅन केक मिक्स अशा पदार्थांची निर्मिती मिलेट्स च्या माध्यमातून करत आहोत.

आमचे प्रॉडक्ट लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये विकायला येणार आहोत, तत्पूर्वी मुले आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चंद्रकातदादांच्या वतीने बाल पुस्तक जत्रेत हा उपक्रम राबावत असल्याचे तृप्ती पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button