July 2, 2025

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदारश्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष ; कार्यकारी विश्वस्तपदी अ‍ॅड. रजनी उकरंडे ; २०२५-२६ करिता नियुक्ती

0
IMG-20250520-WA0052
Spread the love

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी सन २०२५-२६ या मंदिराच्या १२८ व्या वर्षाकरीता अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांची निवड झाली. तर कार्यकारी विश्वस्तपदी अ‍ॅड..रजनी उकरंडे, खजिनदारपदी युवराज गाडवे, उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ आणि उप उत्सवप्रमुख म्हणून अक्षय हलवाई यांची नियुक्ती झाली आहे.

यासोबतच डॉ. पराग काळकर, अ‍ॅड.प्रताप परदेशी, राजेंद्र बलकवडे, सुनील रुकारी हे विश्वस्तपदी असणार आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विधीनिष्णात पदवीधारक असून गेली ३० वर्षे पुण्यामध्ये वकिली व्यवसाय करीत आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेचेही ते सदस्य आहेत.

धमार्दाय कायद्यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. प्रख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थान, श्री महागणपती ट्रस्ट रांजणगाव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच नवी दिल्ली येथील गांधी स्मारक निधी इत्यादी संस्थांचे ते विधी सल्लागार आहेत. तसेच त्यांनी दत्तमंदिर ट्रस्टवर मागील पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष व विश्वस्त म्हणूनही काम केले आहे.

ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे या विधी क्षेत्रात कार्यरत असून खजिनदार युवराज गाडवे हे काका हलवाई या सुप्रसिद्ध मिठाई दुकान मालिकांचे संचालक आहेत. गाडवे यांनी दत्तमंदिर ट्रस्टवर मागील पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष व विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय वीरशैव संस्था आदी अनेक सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ हे पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असून उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई हे व्यावसायिक आहेत.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम होणार आहेत. मंदिराच्या धार्मिक रितीरिवाजांचे पालन करत असतानाच न्यासाच्या निधीचा अधिकाधिक विनियोग सामाजिक कायार्साठी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button