विषय – कर्वेनगर मधील पाणंद रस्त्याबाबत….

23 जानेवारी 2025 ला पुणे मनपा ने धडाकेबाज कारवाई करत कर्वेनगर च्या पाणंद रस्त्यावरील रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या अनेक इमारतींचे बांधकाम पाडले. या भागातील रहिवाश्यांनी व येथील कर्वे स्त्री शिक्षण संस्थे अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील हजारो विध्यार्थिनींनी याचे स्वागत केले व प्रशासनाचे आभार देखील मानले.
मात्र हे पाडकाम होऊन आता चार महिन्याच्या कालावधी उलटला आहे मात्र प्रत्यक्ष रुंदीकरणाचे काम रखडले आहे.
अवकाळी पावसाचा तडाखा तर बसलाच आहे पण मान्सून चे देखील आगमन होतं आहे. अश्या परिस्थितीत प्रशासन एखाद्या अपघाताची वाट बघत आहे कां असा प्रश्न पडतो.
तरी आपणास ह्या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की हे काम त्वरित पूर्ण करावे व नागरिकांना दिलासा द्यावा.
आपला,
संदीप खर्डेकर.
प्रवक्ता, भाजप, महाराष्ट्र प्रदेश.
मो – 9850999995
(आज सकाळी काढलेले फोटो सोबत जोडत आहे )