July 2, 2025

ॲापरेशन सिंदूर’ प्रत्युत्तरात, पाकिस्तान कडून मारल्या गेलेल्या ‘८ भारतीय जवानांच्या पत्नींच्या कुंकवाचा बदला’ मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार..?

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


भारतीय सेनेचे ८ पैकी ७ जवान महाराष्ट्रातील ..!
भारतीय सैन्याचा पराक्रम भाजप कडुन हायजॅक करण्याचा प्रयत्न निंदनीय..!

  • काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
    (काँग्रेसची उपरोधिक टिका )
    पुणे दि १४ –
    ॲापरेशन सिंदूर’ प्रत्युत्तरात, पाकिस्तान कडून
    मारल्या गेलेल्या ‘८ भारतीय जवानांच्या व नागरीकांचा पत्नींच्या कुंकवाचा बदला’ मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार असा असा संतप्त सवाल – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की भारतीय सैन्याच्या विजयाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी हपापलेल्या भाजपने महाराष्ट्रातुन तातडीने विजयी तिरंगा यात्रा काढतांना भारतीय सेनेच्या शहीद ८ जवानांपैकी ७ जवान केवळ महाराष्ट्रातील असल्याचे तरी किमान लक्षात ठेवावयास हवे होते व त्याचे गांभीर्य जोपासले पाहिजे होते.
    वास्तविक येणाऱ्या मनपा निवडणूकीच्या निमित्ताने केवळ ‘निवडणूकाभिमुख राजकारण’ करणाऱ्या भाजप कडुन, भारतीय सैन्याचा पराक्रम हायजॅक करण्याचा होत असलेला प्रयत्न निंदनीय असल्याची उपरोधिक टिका देखील काँग्रेसने केली..!
    पहेलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी, काँग्रेस सह विरोधी पक्षांनी सरकार एकमुखाने पाठिंबा दिल्यावर, सरकारने भारतीय सैन्यास कारवाईची पुर्ण मोकळीक व मुभा दिल्याचे देशाने पाहिले आहे.‘
    भारतीय सैन्याने’ देखील, त्याच गतीने निर्णय घेत पाकव्याप्त हद्दीतील अतिरेकी ट्रेनिंग सेंटर्स उध्वस्त केली याचा निश्चितच अभिमान आहे. या कारवाईचे
    देशभरात काँग्रेस सह विविध पक्षांनी व जनतेने भारतीय सेनेचे अभिनंदन ही केले.
    या कारवाईत भारतीय सैन्याने मात्र, निक्षुनपणे पाकिस्तानच्या कुठल्याही सिव्हिल सोसायटी व नागरी वस्ती इ वर हल्ला केलेला नव्हता व नाही.
    मात्र तरी देखील अतिरेक्यांना पुरस्कृत करणाऱ्या व पाठींबा देणाऱ्या घातकी पाकिस्तानने मात्र ड्रोन व मिसाईल द्वारे भारताच्या पुंछ (पंजाब), राजस्थान इ सेक्टर मध्ये आपल्या निष्पाप नागरिकांना, सिव्हिलीयनना लक्ष्य करून मारले, याचा तिव्र धिकाःर व निषेध काँग्रेस पक्ष करत आहे.
    पाकिस्तानच्या विश्वास घातकी युद्धजन्य चढाई मध्ये काही प्रार्थनास्थळे व वास्तुंचे नुकसान होऊन काही सु १४-१५ भारतीय नागरीक जीव गेले व सु ५०-६० जण जखमी झाल्याची नोंद देखील माध्यमातुन पहायला मिळाली. भारतीय सेनेच्या शहीद ८ जवानांपैकी ७ जवान महाराष्ट्रातील आहेत. जवानांच्या कुटुंबियांसाठी राज्य सरकार काय देणार..? अशी विचारणा ही त्यांनी केली..!
    महाराष्ट्रातील शहीद जवान…!
    1 सचिन यादव वनंजे – तमलूर, देगलूर, नांदेड, महाराष्ट्र
    2 मुरली श्रीराम नाईक – कामराज नगर, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र
    3 सुरजकुमार रामसहाय यादव – गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुवा, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
    4 सुनील पंडित चौधरी – गाव: माहुर, तालुका: माहुर, जिल्हा: नांदेड, महाराष्ट्र
    5 सुरेशकुमार रामनाथ यादव – गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुवा, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
    6 सुरेश माणिकराव शिंदे – गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुव crumbling, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
    7 सागर गंगाराम पाटील – गाव: खुटेफ़ळ, तालुका: अक्कलकुवा, जिल्हा: नंदुरबार, महाराष्ट्र
    8 झंटू अली शेख, पश्चिम बंगाल
    ————————————///————
    मा संपादक——————- दै वृत्तसंस्था
    स न वि वि
    कृपया वरील वृत्तांत आपल्या लोकप्रिय वृत्त संस्थेत प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे, विनंती.
    आपला
    भूपाल पंडीत
    प्रसिद्धी सहाय्यक
    गोपाळदादा तिवारी संपर्क कार्यालय,
    अक्षय श्री, २१६ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे ३०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button