फोटोग्राफी करताना प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून जातोअभिनेता सौरभ गोखले यांचे मत: स्टारविन्स फाउंडेशन च्या वतीने ‘क्षण पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न

पुणे : जेव्हा मी व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करत नव्हतो तेव्हा मी कॅमेरा घेवून गणेशोत्वात फिरायचो तेव्हा कळले की फोटोग्राफी हे क्षेत्र किती उपयुक्त आणि इन्ट्रेस्टिंग आहे. जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करता तेव्हा प्रत्येक क्षण तुम्हाल काही तरी देवून जातो काही करी शिकवून जातो. आता फोटोग्राफी क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. कॅमेरे देखील सतत बदलत आहेत त्यामुळे हे खूप आव्हानात्मक झाले आहे, असे मत अभिनेता सौरभ गोखले यांनी व्यक्त केले.
स्टारविन्स फाउंडेशनच्या वतीने विविध छायाचित्रांच्या माध्यमातून जगभरातील छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘क्षण’ हे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-यांना ‘क्षण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आमदार हेमंत रासने, दिग्दर्शक सागर वंजारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रणव तावरे, सहसंचालक राज लोखंडे, कौशिक कुलकर्णी, अक्षय जाधव, विवेक शिवेकर, सई कुलकर्णी, वृषाली वडनेरकर हे उपस्थित होते.
कलाक्षेत्रातील सौरभ गोखले, व्यवसाय क्षेत्रातील शेखर मते, छायाचित्रण क्षेत्रात दिलीप आणि प्रतिभा गोरे, सामाजिक क्षेत्रात पियुष शहा आणि क्रीडा क्षेत्रात साहिल मुजावर यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
हेमंत रासने म्हणाले, पूर्वी फोटोग्राफीला एक व्यावसायिक आणि गंभीर स्वरूप होते. आज मोबाईल कॅमेऱ्यांमुळे ती सहजसोप्या रूपात आली असली तरी, तितकीच आव्हानात्मकही बनली आहे. अशा काळात छंद म्हणून फोटोग्राफी जपणे आणि ती जोपासणे खरोखरच प्रशंसनीय आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात कलेसाठी स्वतःला समर्पित करणे हे खूपच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. हे प्रदर्शन दिनांक १७ मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे विनामूल्य सुरू आहे.
फोटो ओळ : स्टारविन्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘क्षण’ या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सुरू आहे. या वेळी विविध मान्यवर आणि पुरस्कारप्राप्त कलाकार उपस्थित होते.