July 4, 2025

श्री गणेश गीतेतील कर्मयोगावर प्रवचनमाला रविवारपासून (दि.१८)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज करणार निरुपण

0
IMG-20250516-WA0023
Spread the love


पुणे : श्री गणेश नामाचा महिमा अद्वितीय आणि अगाध आहे. नाममहात्म्यानंतरचा पुढील टप्पा श्री गणेश गीतेतील कर्मयोग हा असून याविषयावरील प्रवचनमालेतून गणेशभक्तांसमोर कर्मयोग उलगडण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज हे निरुपण करणार असून प्रवचनमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दि. १८ ते २४ मे दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. भगवान गणेशांच्या सगुण साकार स्वरूप आणि विविध अवतारांच्या विस्मयकारी लीलांची गाथा म्हणजे श्री गणेश पुराण आहे. पुराणातील विविध कथांच्या आधारे, त्यातील कथनीय मूल्यांच्या आधारे, आपल्या जीवनाला सुंदर करण्याचा पुराण कथा श्रवण करणे हा राजमार्ग आहे. याद्वारे श्री गणेश नामाचा अद्वितीय महिमा गणेशभक्तांसमोर मागील प्रवचनमालेत उलगडण्यात आला होता.

मागील निरूपण मालिकेत पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्री गणेशांनी राजा वरेण्याला सांगितलेल्या विषयांच्या आधारे त्याचा प्रश्न आहे की आपण ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा यापैकी एक काय ते सांगा. त्यावर दोन्हीचे परिणाम एकच आहेत, हे सांगत भगवान सुरुवातीला कर्मयोगाचे महत्त्व सांगतात. तेच महत्व या प्रवचनमालेत सांगण्यात येणार आहे.

कर्म आणि कर्मयोग यातील फरक, कर्माचा नव्हे तर फलाचा त्याग, अवतार घेण्यामागचे प्रयोजन, अवतारातील कर्मयोग, संत संगतीचे महत्त्व, योगाचे आणि प्राणायामाचे स्वरूप अशा विविध विषयांवर विवेचन करीत श्री गणेशांनी गणेश गीतेतील कर्मयोग स्पष्ट केलेला आहे. या निरूपण मालिकेत या सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद पुंड शास्त्री महाराज करणार आहेत. तरी गणेशभक्तांनी प्रवचनमालेत मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button